नांदेड (Nanded):- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची आज दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर जाहीर प्रचारसभा पार पडणार आहे.
या प्रचार सभेला महाविकास आघाडीचे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या प्रचार सभेची जय्यत तयारी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलीय जवळपास १ लाख नागरिक याठिकाणी बसू शकतील अशी आसन व्यवस्था याठिकाणी करण्यात आलीय. आज दुपारी ३ वाजता राहूल गांधी यांची प्रचार सभा नांदेडमध्ये पार पडणार आहे.