नांदेड(Nanded) :- मांडवी भागात उष्णतेची लाट असुन या जीवघेण्या उन्हांमुळे काल दुपारी 2:30 वाजता किनवट तालुक्यातील पाटोदा (बू) येथे घरासमोर उभी असलेली पाशा यांची ओमनी (Omni) गाडीने तिव्र उष्णतेमुळे आपोआप पेट घेतला.विशेष म्हणजे ही ओमनी गॅसवर(Gas) चालणारी होती.
पेट घेतलेल्या ओमनीमुळे स्फोट (explosion) होईल या भितीने ग्रामस्थांना पछाडले. हिंमत करुन काही लोकांनी पाणी टाकून विझवल्याने पुढील अनर्थ (calamity) टळला. सर्व ओमनी चालकांनी जास्त लांबचा प्रवास करताना विश्रांती स्थळावर थांबून पुढील प्रवासाकरीता निघावे तसेच जास्त ऊन्हामधे ओमनीमधे गॅसभरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.