Nanded :- नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी येथिल जिल्हापरिषद शाळेत(Zilla Parishad School) २१ वर्ष सेवा देवून सेवानिवृत्त झालेले अंध विशेष शिक्षक शंकर संगेवार यांना सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारे पेंशन जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिले जात नसल्यामुळे पिडित शिक्षकांच्या मुलांने आपल्या वडिलांना घेवून नांदेडच्या जिल्हापरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. वडिल हे अंध असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही उत्पनाचे साधन नाही. त्यामुळे शासनाने आमच्यावर अन्याय न करता माझ्या वडिलांना पेंशन देवून न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे.