नांदेड (Nanded) :- मुख्यमंत्री युवा कार्यक्रम योजनेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन
शासनाने राज्यात मुख्यमंत्री (Chief Minister) युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या मागचा हेतू म्हणजे युवा वर्गाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी अर्ज सादर करताना त्यांना अनुभव विचारला जातो, त्यासाठी या योजनेद्वारे अनुभवाची संधी मिळणार आहे, सहा महिन्यासाठी कोणत्याही शासकीय किंवा खासगी आस्थापनात युवा प्रशिक्षणार्थी (Youth Apprentice) म्हणून नियुक्त होऊ शकता येते,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.