वाहन चालक पसार
नांदगाव पेठ (Nandgaon Accident) : एमआयडीसी मधून परत येत असतांना एका ऑटोला भरधाव राखेच्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऑटोचालक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एमआयडीसी मधील झिरो पॉईंट जवळ घडली.अरुण वासनिक (५८) रा सावर्डी असे (Nandgaon Accident) अपघातात ठार चालल्या चालकाचे नाव असून घटनेनंतर वाहनचालक फरार आहे.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, अरुण वासनिक हे ऑटो क्र एम.एच.२७,ए.एफ. २२४९ ने भाडे घेऊन एमआयडीसी मध्ये गेले त्यांनतर परत येताना झिरो पॉईंट जवळ अज्ञात भरधाव राखेच्या वाहनाने ऑटोला धडक दिली.अपघातामध्ये चालक अरुण वासनिक हे गंभीर जखमी झाले त्यांनतर स्थानिक लोकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान अरुण वासनिक यांची प्राणज्योत मालवली. (Nandgaon Accident) घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.