एसएमएसच्या विषाक्त पाण्यासंदर्भात खा. बळवंत वानखडे आक्रमक
नांदगाव पेठ (Nandgaon farmers) : पंचतारांकित एमआयडीसीमधील एसएमएस कंपनीचे दूषित व विषाक्त पाणी नदीत व जलस्त्रोतांमध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. गावकऱ्यांच्या तक्रारींनंतर खा. बळवंत वानखडे (MP Balwant Wankhade) यांनी शनिवारी थेट एसएमएस कंपनीचे कार्यालय गाठून अभियंत्याला चांगलेच खडसावले. दूषित पाण्यामुळे शेती खराब होत आहे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तरी सुद्धा एसएमएस कंपनी कोणत्याही उपाययोजना करत नसल्याने खा. बळवंत वानखडे यांनी एसएमएस कंपनीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. खा. वानखडे (MP Balwant Wankhade) यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करावी अश्या सूचना देखील यावेळी दिल्या.
दरवर्षी पावसाळ्यात एसएमएस कंपनीचे दुषित पाणी नदीपात्रात तसेच पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोतांमध्ये शिरते. या प्रकारामुळे नांदगाव पेठ मधील नागरिकांना दूषित आणि विषाक्त पाण्याचा सामना करावा लागतो.शिवाय नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील एसएमएस कंपनीच्या व्यवस्थापनाने याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी सुद्धा एसएमएस कंपनीचे विषाक्त व दूषित पाणी जलस्त्रोतांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांनी खा. बळवंत वानखडे यांचेकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने खा. बळवंत वानखडे (MP Balwant Wankhade) यांनी शनिवारी दुपारी एसएमएस कंपनीला भेट दिली होती.
एसएमएस कंपनीचे अभियंता केळापूरे यांच्याकडून प्रकल्पाची संपूर्ण पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ज्या (Nandgaon farmers) शेतकऱ्यांच्या जमिनी या पाण्यामुळे खराब झाल्या त्यांनाही तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच जमिनीचे अधिग्रहण सुद्धा तात्काळ करण्यात यावे अशी सूचना खा. बळवंत वानखडे (MP Balwant Wankhade) यांनी अधिकाऱ्यांना दिली. येत्या आठ दिवसात संपूर्ण अहवाल सादर करण्यात यावे असे सूचित करण्यात आले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे,राजेश बोडखे, माजी जि.प.सदस्य नितीन हटवार,विनोद डांगे, प्रा. मोरेश्वर इंगळे, ज्ञानेश्वर बारस्कार,मुकुंद पांढरीकर, शेख तौसिफ यांचेसह परिसरातील शेतकरी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.