नांदगाव पेठ (Nandgaon Peth Crime) : एकतर्फी प्रेमातून युवकाने युवतीला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या (Nandgaon Peth Crime) दिल्याने तसेच पैसे न दिल्यास युवतीचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची भीती दाखवत असल्याने युवतीने १५ जून रोजी कुटुंबियांसह पोलिसांत तक्रार दाखल केली मात्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेऊन (Nandgaon Peth Police) पोलिसांनी त्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्याने त्या युवकाने गुरुवारी थेट युवतीचे घर गाठून तिला ब्लॅकमेल करत पैश्याची मागणी केली व तसेच युवतीला जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून युवतीचे फोटो व विडिओ व्हायरल करण्याची सुद्धा धमकी दिली.
तक्रारीनंतरही तो युवक थेट शिरला युवतीच्या घरात
फोनवर बोल अन्यथा तुझा खून करेल, तुझ्या कुटुंबाला संपवेन अशी एकतर्फी प्रेमातून धमकी देणाऱ्या सोमेश्वर जाधव (रा.सालोरा धोत्रा) याच्या विरोधात पीडित युवतीने व तिच्या कुटुंबाने १५ जून रोजी लेखी तक्रार दिली होती. (Nandgaon Peth Crime) धमकीचा प्रकाराने अत्यंत भयभीत झालेल्या युवतीला व तिच्या कुटुंबाला धीर देण्याऐवजी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली व पीडिताला घरी पाठवले. मात्र (Nandgaon Peth Police) पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे गुरुवारी सदर युवकाने पीडितेच्या घरी जाऊन पुन्हा जीवे मारण्याची तसेच पैसे दे अन्यथा तुझे फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली शिवाय जातीवाचक शिवीगाळ करून सर्वांना फसविण्याचा सुद्धा त्याने इशारा दिल्याने पीडिता व तिच्या कुटुंबावर एकप्रकारे दहशत निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून दहशतीच्या सावटात वावरणाऱ्या पीडित युवतीने व कुटुंबीयांनी पुन्हा (Nandgaon Peth Police) नांदगाव पेठ पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी वृत्तलिहिस्तोवर कोणताही गुन्हा संबंधित युवकावर दाखल केलेला नव्हता किंवा त्याला ठाण्यात हजर करून समज सुद्धा देण्यात आली नाही त्यामुळे त्या युवकाला पोलीस प्रशासन एकप्रकारे सहकार्य करत असून पीडितेला धमकवण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही
नांदगाव पेठ पोलीस स्टेशन मध्ये दोन वेळा लेखी स्वरूपात तक्रार दिली तरी सुद्धा पोलिसांनी याबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. मी अत्यंत मानसिक स्थितीत आहे. या प्रकारामुळे मला त्रास होत आहे हा त्रास वाढतच राहला तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही.
पीडित युवतीच्या आईशी हुज्जतबाजी करत लोटले
सदर युवकाने पीडितेच्या घरी जाऊन दहशत निर्माण करणारे कृत्य केले,जातीवाचक शिवीगाळ करून कुटुंबाला (Nandgaon Peth Crime) जीवे मारण्याची धमकी त्या युवकाने दिली दरम्यान युवतीच्या आईने समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकाने आईशी हुज्जतबाजी करून तिला लोटले असा आरोप सुद्धा पीडित युवतीने केला आहे.