आशा कार्यकर्त्यांना या किटमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम करता येणार..!
नंदुरबार (Nandurbar) : नवापूर तालुक्यातील गावपातळीवरील 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किट (Digital Health Screening Kit) वितरित करण्यात आले. या किटच्या मदतीने गरोदर माता, स्तनदा माता, नवजात अर्भक आणि लहान मुलांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवता येईल. तसेच वेळेवर निदान (Diagnosis) करून आवश्यक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre) संदर्भित करता येईल.
या किटमध्ये डिजिटल थर्मामीटर, डिजिटल बेबी वेटिंग स्केल, माता व मुलासाठी वजन मोजण्याचे यत्र, पल्स ऑक्सिमीटर, किट बॅगसह यांचा समावेश आहे. बालमृत्यू कमी करण्याच्या कार्यात अहोरात्र झटणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना (Asha Worker) या किटमुळे आरोग्य सेवा (Health Care) अधिक सक्षम करता येणार आहे. वितरण समारंभाला जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. रवींद्र सोनवणे, तहसीलदार दत्ता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रजनी नाईक, सीएआरडीचे सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, विस्तार अधिकारी के. बी. मोरे, आशा कार्यकर्त्या जिल्हा समन्वयक प्रसाद सोनार, तालुका समन्वयक श्रीमती शीतल भावसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) उपस्थित होते. ही महत्वपूर्ण योजना दूरदृष्टीने आणि केंद्रीय अतिरिक्त सचिव प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या उपक्रमात सीएआरडी संस्थेचे (CARD Institute) सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, कैलास खरात, महेश ढोकरे आणि अजिंक्य जाधव यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. रवींद्र सोनवणे यानी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (Bharat Petroleum Co. Li.) आभार मानले.