नंदुरबार (Nandurbar) : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे पोलिसांनी कारवाई करुन जप्त केलेली सुमारे 79 लाख रुपयांची अवैध दारू (Alcohol) दोन जेसीबीद्वारे (JCB) नष्ट करण्यात आली. पोलिसांच्या देखरेखीखाली सदरची कार्यवाही करण्यात आली.
अक्कलकुवा पोलीस ठाणे अंतर्गत 32 गुन्ह्यातील सुमारे 79 लाख 10 हजार रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला होता. हा अवैध दारूसाठा पोलिसांनी दोन जेसीबीचा सहाय्याने नष्ट केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफॉरमेशनल प्रोग्राम (Transformational Program) कार्यक्रम अंतर्गत न्यायालय यांचा परवानगीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलिस अधीक्षक आतिश कांबळे यांचा मार्गदर्शनाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन मधील 32 गुन्ह्यातील सुमारे 79 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या अवैध दारूसाठा हा दि. 17 जानेवारी रोजी जामली नर्सरी ता. अक्कलकुवा येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटिल (Police Sub-Inspector Manoj Patil), उत्पादन शुल्क विभागाचे प्रणव मोरे यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.