गुरूदत्ताश्रम विर्शी येथील श्री दत्तात्रय कथेत प्रतिपादन
देशोन्नती वृत्तसंकलन
सेंदूरवाफा (Nari Shakti) : धार्मिक क्षेत्र हे संगठणशक्तीचे फार मोठे माध्यम आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविक श्रद्धा भक्तीयुक्त अंतःकरणाने एकत्र येतो आणि जीवन उद्धाराचा नवा संदेश घेवून जातो. आपल्या भारतात स्त्रीयांना मानाचे स्थान दिले जाते. माता जिजाऊने छत्रपती शिवाजीराजांना घडवले नसते तर या देशाचा अभिमान केव्हाच मातीत मिसळला असता. शिवरायांनी युवकांना देव, देश आणि धर्मासाठी लढण्याची प्रेरणा दिली. या देशाला योग्य दिशा देण्यासाठी नारीशक्तीने फार मोठे योगदान दिले आहे. नारी शक्ती (Nari Shakti) ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे असे प्रतिपादन ह.भ.प. साध्वी यशोदामाई फटींग यांनी विर्शी येथे केले.
श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून गत पन्नास वर्षांची परंपरा खंड ठेवत निष्काम कर्मयोगी संत कृष्णाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री गुरूदत्ताश्रम दत्तनगर विर्शी येथे श्री दत्त देवस्थान समिती व विर्शी ग्रामवासीयांच्या वतीने श्री गुरूचरित्र दत्तात्रय कथेचे दि. ८ डिसेंबर २०२४ पासून आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या कथेचे तिसरे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. त्यांना संगीत साथ ह.भ.प. किसन भेंडारकर, अरूण ब्राम्हणकर, प्रमोद कायलकर, गुडू दाणे आणि ह.भ.प.ललिता शिवनकर देत आहेत.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष पदमाकर गहाणे, सचिव नानेश्वर लोधीकर, सुखदेव जांभूळकर, मारोती कापगते, रामचंद्र कापगते, कोमल कापगते, यशवंत कापगते, शामराव बागडकर, दुधराम लांजेवार, गोपाल क्षिरसागर, किसन राऊत, सिता लांजेवार, सरस्वता चौधरी, बेबी गुप्ता, देवळू लोथीकर, सुधा लांजेवार, सुमित्रा लंजे, जना लांजेवार, स्नेहलता पुस्तोडे आदी उपस्थित होते. दररोज दु. २ ते ५ भाविक भागवत कथेचा लाभ घेत आहेत.
दि. १५ डिसेंबर रोजी दु. १२ वाजता हवन, २ वाजता गोपालकाला व ४ वाजता महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. काल्याच्या प्रसंगी संतकवी डोमाजी कापगते महाराज लिखित ‘संत कृष्णाजी महाराज (लोधीकर) यांचे चरित्र या पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी आ. नाना पटोले, आ. परिणय फुके, माजी आ. राजेंद्र जैन, सुनिल फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, होमराज कापगते, प्रकाश बाळबुद्धे, अशोक कापगते, जि.प. सदस्या शितल राऊत, सरपंच लीलाधर सोनवाने, पो. पा. नंदकुमार गहाणे, संत डोमाजी कापगते आदी मान्यवर उपस्थित राहतील. जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष पदमाकर गहाणे, सचिव नानेश्वर लोधीकर व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.