भरपावसात आकसापोटी बेलोना ग्रामपंचायतीची अतिक्रमण हटाव कारवाई
नरखेड (Narkhed Young fire) : पन्नास वर्षांपूर्वीपासून वास्तव्य असलेल्या झुडूपी जंगलाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी (Bellona Gram Panchayat) बेलोना ग्रामपंचयतचे पदाधिकारी भरपावसात गेले. या नियमबाह्य कारवाईला विरोध करीत तरुणाने आज बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अंगावर पेट्रोल (Narkhed Young fire) टाकून स्वत: पेटवून घेतले. यात तो ७० टक्के भाजला असून, त्याच्यावर मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचार सुरू आहे. अरविंद रमेश बांबल (वय ३८) रा. बेलोना असे पीडित तरूणाचे नाव आहे.
मौजा बेलोना सर्व्हे नं. २३० मध्ये झुडूपी जंगल जागेची महसूल विभागाच्या रेकॉर्डला जनावरांसाठी मुकर्रर अशी नोंद आहे. पेठ विभागातील वार्ड क्र. ३ मधील ६ -७ कुटुंबांनी २५-३० वर्षापुर्वी या जागेवर अतिक्रमण करून घरे व जनावरांचे गोठे बांधली आहेत. अरविंद यांचा येथे जनावरांचा गोठा आहे.(Bellona Gram Panchayat) ग्रामपंचायत इमला कर लावून त्यांच्याकडून कर वसूल करत आहे. पावसाळ्यात अतिक्रमण हटवू नये, असा महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट नियम आहे. आणि झुडूपी जंगलावरील अतिक्रमण हटविण्याचा अधिकार केवळ वन विभागाला आहे. असे असतांना बेलोना ग्रामपंचायतीने अरविंद यांचे वडील रमेश बांबल यांना अतिक्रमणबाबत नोटीस दिले होते.
आज बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भरपावसात ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी पोलिस बंदोबस्तात जेसीबी व ट्रॅक्टरसह केवळ रमेश बांबल यांचे अतिक्रमण हटविण्याकरीता गेले. बांबल कुटुंबियांनी कारवाईला विरोध केला. (Bellona Gram Panchayat) ग्रामपंचायतीने केवळ रमेश बांबल यांनाच टॉर्गेट केले. ते का? असे म्हणत रमेश बांबल यांचा मुलगा अरविंद याने कारवाईला विरोध करीत अंगावर पेट्रोल ओतून (Narkhed Young fire) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात तो ७० टक्के भाजला. पोलिसांनी आग विझवून लगेच ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे व नंतर गंभीर स्थितीत मेयो हॉस्पीटल नागपूर येथे हलिविले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
अरविंद बांबल याने जिवना नदी खोलीकरणचे बिल काढण्यावरुन (Bellona Gram Panchayat) ग्रामपंचायत विरुध्द मुख्यमंत्री व संबंधित सर्व अधिकार्यांना तक्रार दिली होती. त्याचा वचपा काढण्याकरीता केवळ रमेश बांबल यांना टॉगेट बनवून त्यांच्या जनावराच्या गोठयावर आकसापोटी ग्राम पंचायतीने नियमबाहय कारवाई केल्याची चर्चा गावात आहे. ही चुकीची कारवाई करणारे ग्राम पंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.