नाशिक (Nashik Bus Acciddent) : बस चालकाने ब्रेक एेवजी एक्सेलटवरच पाय दिल्याने गाडी जोरात पुढे धावली त्यातून चार वाहनांना (Nashik Bus Acciddent) बसने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. त्र्यंबकरोडवरील पिनॅकल मॅालजवळ हा अपघात झाला. या अपघातात शिवशाही बसने चार वाहनांना धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या (Bus Acciddent) अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नाही.
बस स्टॅण्डवरुन बस निघाल्यानंतर पिनॅकॅाल मॅालजवळ हा (Nashik Bus Acciddent) अपघात झाला. या बसखाली दोन दुचाकी आल्याने त्याला फरफटत बसने नेले. त्यामुळे या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. दुचाकीस्वार दुचाकी सोडून बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या (Bus Acciddent) घटनेनंतर मुंबई पोलिस नाका येथील पोलिस घटनास्थळी पोहचले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.