नाशिक(Nashik):- शेतकऱ्यांचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर (Lok Sabha constituencies) कब्जा करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) उद्या (ता.१५) पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे येत आहे, ते केवळ चारशेचा आकडा पार करण्यासाठी. पण तेथील शेतक-यांनी दिंडोरीकरांच्या वतीने जाहीर आव्हान पंतप्रधान मोदींना देण्यात येत आहे. ‘पहले करो दिंडोरी पार, फिर एलान दो चारसो पार’.
एकरी उत्पन्नाचे खर्चावर १८ हजार रुपयाचा टॅक्स
संपूर्ण देशाबरोबरच शेतकऱ्यांच्या अवहेलनेने पीडित झालेला दिंडोरी मतदार संघ आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः भुकेकंगाल केल्याचा दावा तेथील शेतक-यांनी केला आहे. सर्वाधिक कर्ज बाजारी(Debt Market) असलेला शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम मोदी सरकारने केले असून शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार या विषयांची पुरी वाट लावली असून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपयांच्या बदल्यात जीएसटीच्या (GST) माध्यमातून शेतकऱ्याच्या एकरी उत्पन्नाचे खर्चावर १८ हजार रुपयाचा टॅक्स भरावा लागत आहे.
पिठाला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची भेट
कधी नव्हे इतकी वेठ बिगारीत व गुलामगिरीत सामान्य जनता जगत आहे. धान्याच्या पिठापासून दूध, ताक, मीठ, मिरची व तेलावर टॅक्स (tax) लागू करून सामान्य माणसाच्या जेरीस आणण्याचे काम मोदी सरकार करत आहे. परंतु दिंडोरी ही शूरवीरांची भूमी प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याची, तसेच महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठापैकी एक सप्तशृंगी हे आद्य शक्तीपीठ आहे. या पिठाला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी(Chhatrapati Shivaji Maharaj) भेट दिली होती. ती दिंडोरी किंवा दिंडोरी मतदार संघ काबीज करण्याचे मनसुबे मोदींनी रचले असवे, तरी ‘पहले करो दिंडोरी पार, फिर एलान दो चारसो पार’ असे नारे द्यायला परिसरातील शेतक-यांनी सुरूवात केली आहे.