नाशिक (Nashik Girl Abused) : बदलापुरातील प्रकरण सुरु असतानाच नाशिकमधील सिन्नर येथील धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नाशिकात मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
या नराधमाने चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. चिमुकली राहत असलेल्या गावातील संशयिताने हे संतापजनक कृत्य केल्याचे उघड झाले आहे. चिमुकलीच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, (Nashik Police) पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. त्यानंतर आरोपीकडून मुलीची सुटका करण्यात आली आणि संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
धक्कादायक प्रकरणात नक्की काय घडले?
संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाने चिमुकलीचे अपहरण (Nashik Girl Abused) केले. बराच वेळी चिमुकली आली नाही, म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता, चिमुकली कुठेच सापडली नाही. त्यावेळी चिमुकलीसोबतच गावातील संशयित तरुणही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
कुटुंबियांनी तात्काळ पोलिसस्टेशनमध्ये चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले. चिमुकलीचे त्यानेच अपहरण (Nashik Girl Abused) केल्याचे समोर आले. चिमुकली सापडल्यानंतर (Nashik Police) पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. पचारानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. या प्रकरणातील संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.