स्वामी शांतिगिरी महाराजांनी प्रसिद्ध केला लक्षवेधी वचननामा
नाशिक (Nashik Loksabha) : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातील (Nashik Loksabha) अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी नाशिकच्या विकासाचा वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी शेतकरी, नागरी सुविधा, उद्योग, कनेक्टिव्हिटी, शिक्षण, धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास, महिला व युवती सक्षमीकरण, युवा सक्षमीकरण, आरोग्य सेवा, कामगार कल्याण, साहित्य, कला व संस्कृती, पर्यावरण संवर्धन या विषयांवर विषेश लक्ष दिले आहे.सर्वांगाने नाशिकचा विकास होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गुरूकुल पद्धतीचे शिक्षण देण्यास प्राधान्य
शांतीगिरीजी महाराजांचा जय बाबाजी भक्त परिवार देव-देश-धर्म यावर कार्य करतो.अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्र कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. वचन नामा जाहीर करतांना (Shantigiri Maharaj) महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले, निवडून आल्यास नाशिक मधील अंजनेरी गड येथे असलेल्या हनुमान जन्मभूमीचा जलद गतीने सर्वांगीण विकास करणार आहे. (Nashik Loksabha) खासदारकीसाठी दिला जाणारा पगार जनतेच्या कामासाठी वापरणार आहे. वयक्तिक खर्च करणार नाही. आगामी काळात गुरूकुल पद्धतीचे शिक्षण देण्यास प्राधान्य देऊ, असे सांगून ‘जे बोलणार तेच काम करणार’ असेही स्वामी शांतीगिरीजी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले यांना आजच्याच दिवशी महात्मा ही पदवी मिळाली होती आणि (Shantigiri Maharaj) शांतिगिरी महाराजांनाही जनार्दन स्वामी बाबू महात्मा म्हणत असत त्याच आजच्या योगावर वचननामा जाहीर होत असल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले.
मानधन जनतेच्या कामासाठी वापरणार: Shantigiriji Maharaj
खासदारकीसाठी (Nashik Loksabha) दिले जाणारे मानधन हे जनतेच्या कामासाठी वापरणार आहे. आईची दुर्दशा झाल्यावर दुःख होते , तसेच दुःख आज अंजनेरी गडावर गेल्यावर होते. सेंद्रिय खताचा कारखाना उभारायचा…सर्व कचरा आणून प्रक्रिया करून शेतीसाठी मिळावा. सध्या पैसे कसे कमवायचे हेच सध्या शिकवले जाते.मात्र संस्कार दिले जात नाही. त्या पार्शवभूमीवर आदर्श शिक्षण पद्धतीच चा अवलंब करनार आहे.
– महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज, प्रभावी अपक्ष उमेदवार