नाशिक (Nashik Municipality) : शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहेत. त्यामुळे पायी जाणाऱ्या ,गाडीवर जाणाऱ्यांच्या मागे लागणे चावा घेणे असे अनेक समस्यांना शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात (Nashik Municipality) महापालिका अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन तक्रार केली असता, यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर सदर कारवाई करण्यात येईल, अशी उत्तरे देण्यात आली. या संदर्भात मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
जुने नाशिक परिसरातील फुले मार्केट, जुनी तांबट लेन, भद्रकाली, चौक मंडई, सिडको, सातपूर, अंबड, नाशिक रोड या भागात अनेक 12 ते 15 व्यक्तींना चावा घेन्यात आला. तसेच दुचाकी चे अपघात झाले. सदर तक्रारी चे निवारण केले असते तर सदर अपघात घडला नसता. या पुढे होणाऱ्या अनार्थस (Nashik Municipality) महापालिका अधिकारी जबाबदार राहतील. तरी आपण याबाबत लक्ष घालून सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा (Yuva Sena) युवासेनेच्या वतीने कुत्रे पकडून महापालिकेत आणून सोडण्यात येईल, असा ईशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश बर्वे,पवन दातीर यांनी दिला. यावेळी महानगर प्रमुख आकाश उगले, नंदेश ढोले, शुभम घुले कल्पेश पिंगळे, नितीन फडोळ, उदय जाधव, समर्थ मुठाल, यश खैरे, गोविंद कांकरिया, सचिन रत्ने, सोनू कोथमिरे, आदींनी दिला आहे.