प्रा.सुनील हिंगणे यांचे प्रतिपादन
नाशिक (Poetry Reading Award 2024) : लहान मुलांना मोबाईल पासून बाजुला ठेवून वाचनाची गोडी लावणे हे सर्वस्वी पालकांच्या हातात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समिक्षक प्रा. सुनिल हिंगणे (Prof. Sunil Hingane) यांनी केले. ते म्हणाले की, इंग्रजी साहित्यामध्ये मराठी शब्दांचा वापर होत नाही पण मराठी साहित्यिक मात्र इंग्रजी शब्दांचा वापर सर्रास करतात हे दुर्देवी आहे. ते नाशिक कवी आयोजित कै. प्रा. डॉ. सुरेश मेणे काव्यपुरस्कार आणि कै. मीनाताई धामणे काव्यवाचन पुरस्कार २०२४च्या (Poetry Reading Award) पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी राज्यस्तरीय काव्यसंग्रह प्रथम पुरस्कार ब्रम्हपुरी चंद्रपूरचे डॉ. नोमेश नारायण नारायण यांच्या रक्तफुलांचे ताटवे तर जितेंद्र कुंवर, जळगाव यांचा ऋतूपर्णाच्या कविता द्वितीय, गीतेश शिंदे कल्याण यांच्या सीसीटीव्हीच्या गर्द छायेत तृतीय तर सीझर न झालेल्या कविता या सुनील पवार, मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या कविता संग्रहाला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबरोबरच छंदोबद्ध आणि मुक्तछंद या काव्यप्रकारातील काव्यलेखन स्पर्धांचेही पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुक्तछंद गटात विद्या देशमुख, अमरावती यांना प्रथम वीणा कुलकर्णी, अंबाजोगाई द्वितीय, यशश्री रहाळकर नाशिक तृतीय, कीर्ती लंगडे, नागपूर उत्तेजनार्थ तर छंदोबद्ध गटात ठाण्याच्या हर्षदा बेडेकर, प्रथम, जयश्री अंबासकर नागपूर, द्वितीय, निशा चौसाळकर अंबेजोगाई तृतीय तर डॉ. क्षमा वळसंगकर, सोलापूर उत्तेजनार्थ असे विजेते आहेत.
विजेत्यांना रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ वास्तूशास्त्र तज्ञ आर्की. चंद्रकांत धामणे, श्रीनिवास मेणे, सुभाष सबनीस, बाळासाहेब गिरी, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे हे उपस्थित होते. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात हा सोहळा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला याचवेळी सकाळच्या सत्रात झालेल्या कै. मीनाताई धामणे जिल्हास्तरीय (Poetry Reading Award) काव्यवाचन स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सुमारे ८० कविता संग्रह आणि ४०० कविता या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या होत्या. काव्यसंग्रह परीक्षणाचे जिकीरीचे काम श्री. शिवाजीराव चाळक आणि श्री. विजय काकडे यांनी केले तर काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण बडोदा येथील अंजली मराठे आणि पुण्याच्या राजश्री सोले यांनी केले. यावेळी किरण मेतकर, बाळासाहेब गिरी, गोरख पालवे सौ अलका कुलकर्णी, सौ स्मिता बनकर, भारती देव यांनी या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी प्रयत्न केले.
शालेय काव्यवाचन स्पर्धा विजेते
५वी ते सातवी गट
प्रथम विराज लोंढे वाघ गुरुजी शाळा
द्वितीय सोहम पवार व गुरुजी शाळा
तृतीय प्रथमेश मुरांडे शिशुविहार शाळा
उत्तेजनार्थ साहिल संकपाळ डे केअर शाळा
आठवी ते दहावी गट
प्रथम ओजस विकास करंजीकर नाशिक केंब्रिज शाळा
द्वितीय युवराज प्रशांत वाघमारे पेठे विद्यालय
तृतीय शर्वरी हनुमंत बोरसे न्यू मराठा हायस्कूल
उत्तेजनार्थ वेदांत प्रवीण देशमुख विद्या प्रबोधिनी