नाशिक(Nashik):- ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कटिबद्ध आहेत. त्यांनी आनंदी जीवन जगावे आणि संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी मार्गदर्शन करावे,असे प्रतिपादन नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे (Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केले.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष विजय बिरारी यांच्या हस्ते आमले यांच्या सत्कार
चांदशीतील सन्मित्र जेष्ठ नागरिक मंडळातर्फे सत्यजित आमले यांचा सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रम हॉटेल चुलांगण येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जेष्ठांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष विजय बिरारी, सचिव माधवराव पाटील, महिला मंडळ प्रमुखप्राचार्य ज्योत्स्नाताई जाधव आदी होते.
ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. दगदग कमी करावी, डिजिटल युगात फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने ज्येष्ठांनी मोबाईलवर (Mobile)आलेली कोणतीही लिंक ओपन करू नये. कुणालाही आपला ओटीपी (OTP) किंवा पासवर्ड(Password) सेंड करू नये.आपली आर्थिक फसगत होत आहे. हे लक्षात आल्यास तातडीने सायबर सेलशी संपर्क साधावा, असे सांगून आमले यांनी पोलिस यंत्रणांचे काही नंबर ज्येष्ठांना शेअर केले. चांदशी परिसरात रात्रीची गस्त वाढविली जाईल. या परिसरात बससेवा सुरू करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालू असेही ते पुढे म्हणाले. चर्चेत उपाध्यक्ष बी.बी.मोरे, प्रियदर्शन टांकसाळे,प्राचार्य पी.एस.पवार, भगिरथ मंडलिक, शंकराव खरात यांनी भाग घेऊन मौलिक सूचना केल्या. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष विजय बिरारी यांच्या हस्ते आमले यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण कोरडे, बाळासाहेब चालसे, गणपतराव देशमुख, एकनाथ शिरसाठ, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.