नशिक (Nashik Police) : शहरातील गुंतवणूदारांचे सुमारे २५० कोटी रुपये घेऊन सात वर्षांपासून फरार असलेल्या मिरजकर सराफ प्रा. लि.चा मुख्य आरोपी हर्षल प्रकाश नाईक यास नाशिक पोलिसांनी अटक करावी अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा (Yuva Sena) युवासेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गणेश बर्वे यांनी निवेदनाव्दारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिला आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सखोल तपास करून हर्षल नाईकला अटक केली जाईल. गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
युवासेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी
नाशिक शहरातील नामांकित मिरजकर सराफ प्रा. लि. तर्फे गुंतवणूकदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून सुमारे 250 कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून, मिरजकर सराफविरुद्ध गुन्हा दाखल (Nashik Crime) आहेत. यातील मुख्य आरोपी हर्षल प्रकाश नाईक गेल्या सात वर्षांपासून फरार आहे. तो आत्तापर्यंत पोलिसांना का सापडलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त करत असून, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळाव्यात.
गुंतवणूकदारांमध्ये अनेक कामगार, धुणीभांडी करणार्या महिला, सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांनी आपल्या मुलामुलींच्या शिक्षण व विवाह आणि घर खरेदीसाठी ठेवलेले पैसे आहेत. मुख्य आरोपी हर्षल नाईक फरार असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (Yuva Sena) गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने अनेक ठेवीदारांचा मृत्यूही झाला आहे. हर्षल नाईकचे कुटुंबिय मुंबईत राहत आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख पवन दातीर, महानगरप्रमुख आकाश उगले, समर्थ मुठाळ, नंदेश ढोले, यश खैरे, कल्पेश पिंगळे, सुदर्शन चंदनाणी, गोविंद कांकरिया, किरण पाटील, रवींद्र बागलाणे, सचिन रत्ने, सोनू कोथमिरे, अक्षय झुटे आदी उपस्थित होते.
गुंतवणूकदार हवालदिल अन् आरोपींचा शहरात वावर
२५० कोटी फसवणूकप्रकरणात शहरातील नामांकित व्यक्तींचा समावेश असून, ते जामिनावर बाहेर आले आहेत. एका बाजूला गुंतवणूकदार हवालदिल झाला असताना आरोपी काहीच झाले नसल्याप्रमाणे सार्वजनिक जीवनात वावरत आहेत. त्यामुळे (Nashik Police) पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षल नाईकला अटक करावी, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.
युवासेना (Yuva Sena) प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी अधिवेशनात हर्षल नाईकच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केला जाईल. या माध्यमातून गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
– गणेश बर्वे, उपजिल्हाप्रमुख, युवासेना