नांदगाव(Nandgaon):- मुलीच्या अंगावर अक्षदा पडण्याअगोदरच बापाने घेतला जगाचा निरोप लग्नाला(married)काही तास शिल्लक असतानाच नांदगाव शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ अत्यंत सोज्वळ स्वभावाचे तथा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आढाव यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय विकाराच्या (Heart disease) तीव्र झटक्याने बुधवार (दि.१) रोजी पहाटे नाशिक रोड येथे दुःखद निधन झाले. या घटनेमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटेच्या सुमारास ॲड. आढाव यांचे हृदय विकाराने निधन
नांदगाव शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. बाळासाहेब आढाव यांच्या मुलीचे लग्न एक मे रोजी सायंकाळी नाशिक रोड येथे संपन्न होणार होते. आज मुलीचा वाढदिवस (Birthday) देखील होता. मंगळवारी हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. या कार्यक्रमात डिजेच्या तालावर पाहुणे मंडळींनी ठेका धरला होता. अत्यंत उत्साहात हळदीचा कार्यक्रम (Turmeric program) साजरा झाल्यानतर पहाटेच्या सुमारास ॲड. आढाव यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
लग्न घरावर एकच शोककळा
यामुळे संपूर्ण लग्न घरावर एकच शोककळा पसरली. मुलीच्या डोक्यावर अक्षदा पडण्याअगोदरच बापाने जगाचा निरोप घेतला. ॲड.आढाव हे काही वर्षांपूर्वी पत्नीच्या नोकरी निमित्त नाशिक येथे स्थालांतरीत झाले होते. परंतु ते वकिली नांदगाव न्यायालयात (Nandgaon Courts) करीत असत. सुट्टीच्या दिवशी नाशिक येथे जात असत. त्यांनी वकील संघाचे ११ वेळेस अध्यक्ष पद भूषवत होते. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होते त्यांच्या जाण्याने शहरात, परीसरावर मोठी शोककळा पसरली असून नांदगाव शहर वकिल संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.