मानोरा(Washim) :- मातोश्री सुभद्राबाई पाटील आर्ट सायन्स अँड के.पी.टी कॉमर्स कॉलेज मानोरा यांच्या विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(एन इ पी) २०२० व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन संवादपर कार्यशाळेचे आयोजन मानोरा शहरातील प्रतिष्ठित शाळा संत वामन महाराज इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज धामणी, मानोरा या कॉलेज च्या भव्य प्रांगणामध्ये आयोजन करण्यात आले होते.
कॉलेज च्या भव्य प्रांगणामध्ये आयोजन
शाळेतील मुलांनी कल्पकतेने तयार केलेल्या पुष्प गुच्छाने उपस्थित पाहुणे मंडळींचे स्वागत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी २०२० मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, २१ व्या शतकात, दर्जेदार उच्च शिक्षणाचे (higher education) उद्दिष्ट चांगले, विचारशील, उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती विकसित करणे, प्रोब्लेम सोलविंग स्कील असणे, कोल्याब्रेसिन मध्ये काम करणे, कम्युनिकेशन स्कील वाढवणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला सखोल पातळीवर स्वारस्य असलेल्या एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांचा अभ्यास करण्यास सक्षम करणे आवश्यक आहे. त्यात चारित्र्य, नैतिक आणि घटनात्मक मूल्ये, बौद्धिक कुतूहल, वैज्ञानिक स्वभाव, सर्जनशीलता, सेवेची भावना यांचा विकास झाला पाहिजे.
विशेष क्षेत्रांचा अभ्यास करण्यास सक्षम करणे आवश्यक
याव्यतिरिक्त, विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला, मानविकी, भाषा, तसेच व्यावसायिक, तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांसह विविध विषयांमध्ये २१ व्या शतकातील क्षमता विकसित करण्यात मदत केली पाहिजे. दर्जेदार उच्च शिक्षणाने वैयक्तिक सिद्धी आणि ज्ञान, विधायक सार्वजनिक सहभाग आणि समाजासाठी उत्पादक योगदान सक्षम केले पाहिजे. त्याने विद्यार्थ्यांना अधिक अर्थपूर्ण आणि समाधानी जीवनासाठी तयार केले पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्य सक्षम केले पाहिजे. असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मातोश्री सुभद्राबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ एन.एस. ठाकरे यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात प्रवेश घेतांना मदत व्हावी. विद्यार्थ्यांना स्वमर्जीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले करिअर निवडण्याची संधी मिळावी.
प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना आपल्या करिअर विषयी ज्ञान व्हावे
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य, क्षमता जाणून घेऊन त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक प्रगती साधावी. असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केले. ह्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. एस.व्हि. पिंगळे मॅडम. मातोश्री सुभद्राबाई कॉलेजचे प्राध्यापक प्रा. अली, इकबाल डॉ. प्रणव राऊत, नितीन चगदळ, ओम राऊत, कल्पना ठाकरे मॅडम, मयूर हरसूले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं.स्वाती पंडितकर मॅडम ह्यांनी केले तर उपस्थित पाहुणे मंडळींचे आभार प्रदर्शन माजीद शेख यांनी केले.