स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची लाभार्थ्यांकडून विक्रीचे घडतात प्रकार
देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Antyodaya Food Yojana) : आपल्याकडे प्रदेशानुसार खाद्यपदार्थ बदलतात. कुठे तांदुळ, कुठे पोळी, कुठे भाकरी तर कुठे अन्य पदार्थ आहारात मुख्यत्त्वाचे असतात. जिल्ह्यानुरूपदेखील वेगवेगळे खाद्यपदार्थ पाहायला मिळतात. जेवणात वापरल्या जाणाऱ्या अन्नानुसार सरकारी योजनेतून धान्य मिळणे अपेक्षित आहे. पण, अनेक ठिकाणी ताटात पोळीची अधिक मागणी असतानाही त्या भागात सरकारी योजनेत मात्र तांदळाचा भडीमार केल्या जात आहे.
वर्धा जिल्ह्यातील विविध घटकांतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात (Antyodaya Food Yojana) तांदळाचे प्रमाण अधिकच असत्याचे वेगवेगळ्या बाबींवरून दिसून येते. जास्त तांदुळ मिळत असल्याने अनेक जण यातील बहुतांश तांदुळ विक्री करून त्यातून नवीन तांदुळ घेत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे स्वस्त धान्य योजनेच्या माध्यमातून पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याबाबत शासनाने पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांच्या नांच्या माध्यमातून विविध (Antyodaya Food Yojana) योजनांच्या लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केल्या जातो, गरीब कुटुंबांना दोनवेळचे अन्न मिळावे, याकरिता शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंत्योदय अन्न योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करण्यात येतो. त्यात गहू, तांदूळ या धान्याचा पुरवठा लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला करण्यात येतो. त्याकरिता प्रमाणही ठरवून देण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी जेवणात भाताचा थोडा वापर करत गव्हाच्या पोळीचा मोठा समावेश असतो.
काही जिल्ह्यांत मात्र भाताचा सर्वाधिक वापर असतो. असे असताना गहू आणि तांदळाच्या पुरवठ्याचे माप मात्र सर्वत्र सारखेच आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात. वेगवेगळ्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार, तेथील पद्धतीनुसार खाद्यपदार्थ वापरले जात असताना (Antyodaya Food Yojana) शासनाच्या योजनेचे माप मात्र सर्वत्र सारखेच असल्याने बरेचदा मिळालेले धान्य अतिरिक्त ठरते. काही भागात विचार तांदळाचा वापर कमी होतो. परिणामी, जास्त प्रमाणात तांदुळ मिळणारा अतिरिक्त ठरतो आणि नंतर त्याची विक्री होत असल्याच्या बाबी नाकारता येत नाही. योग्य निर्णय त्यामुळे शासनाने या अनुषंगाने योग्य निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
■■ शासनाच्या वतीने अंत्योदय योजनेत प्रत्येक कार्डधारक कुटुंबाला कार्डप्रमाणे १९ किलो गहू आणि १६ किलो तांदुळ दिल्या जातो. तसेच प्राधान्य गटातील कुटंबाला राशन कार्डवरील प्रती व्यक्तीप्रमाणे तीन किलो गहू आणि एक किलो तांदुळाचा पुरवठा केल्या जातो.
■■ वर्धा जिल्ह्याचा विचार केल्यास बहुतांश ठिकाणी गव्हाच्या पोळीचा जेवणात अधिक वापर असतो. मग, तांदुळ मात्र अतिरिक्त ठरतात. अशा स्थितीत तांदळाची बाहेर विक्री केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी काही भागात तांदुळसाठे पकडण्यात आले होते. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.