हिंगोली (National Health Mission) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समावेशन, मानधन वाढ, थकीत वेतनाच्या मागणीकरीता ६ मे रोजीची डेटलाईन दिली असुन ७ में पासुन रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी शेळके यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमुद केले की, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय १४ मार्च २०२५ नुसार किंवा त्यामध्ये आवश्यक बदल करून राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित समावेशन करण्याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (National Health Mission) कर्मचाऱ्यांचे मानधन फेब्रुवारी २०२५ पासुन झाले नसल्याने सर्वांना अत्यंत हलाकिच्या परिस्थितीत सामोरे जावे लागत आहे.
तसेच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचेही (National Health Mission) वेतन फेब्रुवारीपासून प्रलंबित आहेत. पाठपुरावा करूनही वेतन ६ मे पर्यंत अदा करावे, अन्यथा ७ मे पासुन सर्व अधिकारी, कर्मचारी सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शंकर तावरे, श्रीपाद गारूडी, संदिप मुदनर, सचिन करेवार, शेख मुनाफ, अमोल घुगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.