अमरावती (National Karting Championship) : स्थानिक विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंह चौधरी, कार्यकारिणी सदस्य नितीन हिवसे, प्रा. डॉ. पूनमताई चौधरी, पकंज देशमुख, प्रा. विनय गोहाड आणि प्रा. गजानन काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजेंद्र बमनोटे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. याचाच भाग म्हणुन येथील मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी पल्सर गाडीच्या इंजिनपासून रेसिंग कार्ट तयार केली सोबतच 6 Kw च्या डीसी मोटर ची इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट सुद्धा केली.या दोन्ही कार्ट नुकतेच कोइम्बतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उतरविले. गो कार्ट स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत या विद्यार्थ्यांनी आठ बक्षिसांसह द्वितीय क्रमांक पटकावीत अमरावतीचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविले.
प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (National Karting Championship) येथील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या मुलांनी प्रा. अभिजीत ठाकरे आणि प्रा. प्रियंका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन महिने गाडी बनविण्यासाठी परिश्रम घेतले. विविध स्तरांवर पडताळणी झाल्यावर त्याचे सादरीकरण कोइम्बतूर येथे करण्यात आले. कोइम्बतूर येथील अॅकॅडमी ऑफ इंडिजीनेईस मोटर स्पोर्टद्वारा (AIMS) कार्ट रेसिंग नॅशनल चॅम्पियनशिपचे आयोजन १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील सुमारे विविध राज्यांतील ४७ चमूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये १५० सीसी गाडीच्या श्रेणीमध्ये आणि इलेक्ट्रिक कार्टच्या श्रेणीमध्ये अमरावतीच्या मेघे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आठ बक्षिसे पटकाविले.
1. 150 CC CV कार्ट श्रेणीमध्ये ऑल इंडिया रँक 2 (उपविजेता).
2. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
3. एन्ड्युरन्स अंडर cv 150 cc कार्ट श्रेणीमध्ये पहिले स्थान
4. CV 150 cc कार्ट श्रेणी अंतर्गत ऑटोक्रॉस इव्हेंटमध्ये विजेता (पहिला).
5. CV कार्ट श्रेणी अंतर्गत मुलींच्या विशेष सहनशक्तीमध्ये प्रथम पारितोषिक (प्रथम).
6. 5 किलोवॅट ते 6 किलोवॅट EV कार्ट श्रेणीतील ऑटोक्रॉस इव्हेंटमधील विजेता
7. ईकार्ट श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट सांघिक भावना पुरस्कार विजेते
8. CV कार्ट श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार विजेते
प्रा. अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात रहीश झाडे,अजिंक्य कळंबे, ऋतुजित देशमुख, वेदांत लोणारे, परिमल साबळे, रौनक लोटिया, आयुष पाटील, शौर्य चरपे, चैतन्य कथे, वलय आंडे, मंथन बुंदे, वेदांत राउत,शिवम मोझरे, कृणाल दाते, ओमकार पिंपळगावकर, गौरांग देवताळे, श्रेया अदसोड, प्राची इखार, समृद्धी देशमुख, सानिका दारोकर, आचल डोंगरदिवे, पायल डोंगरदिवे, सेजल गद्रे, सृष्टी शिरभाते, वेदिका निकम, आसावरी जुमडे, पृथ्वी धर्माळे, नेहा वाडी, आदी विद्यार्थ्यांनी एकजुटीने गाडी बनवीत या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयीन व्यवस्थापनसह सर्वच स्तराहून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशस्वी प्रकल्पात मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए.डी. शिरभाते आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे डॉ. एस. वी. पट्टालवार यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर.बमनोटे, विदर्भ युथ वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे , उपाध्यक्ष ऍड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, नितीनजी हिवसे, पंकजजी देशमुख, विनयजी गोहाड, शंकरराव काळे, प्रा. डॉ. पूनमताई चौधरी यांनी देखील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली.