राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक
हिंगोली (National Tobacco Control Program) : ३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (Tobacco Control Program) अंतर्गत जिल्हा स्तरीय समन्वय समिती यांची आढावा बैठक निवासी जिल्हाधिकारी गणेश महाडिक ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत (Police Department) पोलिस व आरोग्य विभाग (Health Department) वगळता अन्य कोणत्याही विभाग प्रमुखांनी कार्यवाही केली नसल्याने महाडीक यांनी नाराजी दर्शविली.
ह्या बैठकीत सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक कार्यालय प्रमुख यांना प्रत्यक्ष तंबाखू नियंत्रण बाबत आपल्या स्तरावर काय कार्यवाही केली ह्या बाबत विचारणा केली. (Health Department) आरोग्य व पोलिस विभाग (Police Department) वगळता कोणत्याही विभाग प्रमुख यांनी कार्यवाही केली नसल्याने निवासी जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व शिक्षण विभाग यांनी लवकरात लवकर (Tobacco Control Program) तंबाखू मुक्त शाळा करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. त्याच बरोबर नगर परिषद, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग आदी विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन होत असल्यास रू. २०० पर्यंत दंड आकारावा व आपले कार्यालय तंबाखूमुक्त असल्याबाबतचे घोषणा पत्र तयार करून आरोग्य विभागास महितीस्तव द्यावे अशा सूचना अध्यक्ष यांनी उपस्थितांना दिल्या.
नगर परिषद व (Police Department) पोलिस विभाग यांनी शाळांच्या आवारातील (Tobacco Control Program) तंबाखूची विक्री हटविण्याबाबत कार्यवाही करावी, त्याचरोबर पोलिस विभागाने तंबाखू नियंत्रणासाठी केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षास पाठवावा जेणेकरून जिल्ह्याचा एकत्रित अहवाल राज्य कार्यालयासाठी पाठविता येईल.ह्या आढावा बैठकीस सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख समेत आरोग्य विभागाचे डॉ. बालाजी भाकरे, डॉ. फैसल सलिम खान (ओरल सर्जन, नोडल वैद्यकीय अधिकारी) डॉ. श्वेता आचार्य, कुलदीप केळकर, आनंद साळवे, दिलीप धामणे, सलाम मुंबई फाउंडेशन चे प्रशांत उबाळे, आर्यनंदी विकास संस्था, परभणी चे अंबुरे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजीनगरचे मंगेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.