माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते होणार
पुसद (Sharad Pawar) : पुसद विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांचे, गावकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुसद शहरामध्ये सर्वांना एक व्यासपीठ हवे होते व त्याकरीता एकाच ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी करण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) या पक्षाचे कार्यालय व्हावे अशी सर्वांची ईच्छा होती. त्याप्रमाणे अॅड. आशिष देशमुख प्रदेश अध्यक्ष राकाँ शरदचंद्र पवार पक्ष (लिगल सेल) यांच्या पुढाकारातून येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ येथे माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील (Suryakanta Patil) यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
खा. शरदचंद्र पवार (Sharad Pawar), प्रदेश अध्यक्ष जयंवतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशावरुन हे कार्यालय होत आहे. याप्रसंगी सौ. वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष, गुलाबराव गावंडे माजी मंत्री, बाबासाहेब गाडे पाटील प्रदेश उपाध्यक्ष, अफजल फारुकी प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक, अशोकराव घारफळकर माजी अध्यक्ष जि. प. यवतमाळ, साहेबराव ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष, अॅड. नारायणराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष, संजय पाटील कान्हेकर जिल्हा उपाध्यक्ष, सौ. नलिनीताई चौधरी महिला जिल्हाध्यक्ष, भास्कर पंडागळे जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल, नानाभाऊ जळगांवकर जिल्हा सरचिटणीस, दीपक जाधव जिल्हा सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्याचे योजिले आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. आशिष देशमुख, माधवराव वैद्य, साकीब शाहा, अॅड. सविता आढाव, सैय्यद नवाज अली व तेजस मुकेश यांनी केले आहे.