माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती!
हिंगोली (Nationalist Congress) : राजकारणात पूर्वी तत्वाचे राजकारण असायचे परंतु आज परिस्थितीत महाराष्ट्रात तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू असल्याचे अनेक जण सत्ते मधील पक्षाकडे जात असल्याची माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक (Review Meeting) १८ ऑक्टोंबर रोजी हिंगोलीतील राष्ट्रवादी भवनामध्ये माजीमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत मुनीर पटेल, मनिष आखरे, माधव कोरडे, अॅड. रवि शिंदे, नरसिंह देशमुख, यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (Former Minister Jayaprakash Dandegaonkar) यांची पत्रकार परिषद (Press Conference) घेण्यात आली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, कोणत्याही पक्षाला चढ उतार ही नेहमीच पहावे लागते. परंतु आज आपण सत्तेत नसलो तरी हतबल न होता, थोडासा संघर्ष करणेही गरजेचे आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी पक्षातून नेते व कार्यकर्ते गेल्याने पक्षाचे नुकसान झाल्याची कबुली त्यांनी दिली. पक्षांतर केलेल्या नेत्याबरोबर हजार, पाचशे मतदार असा त्याचा अर्थ कदापीही काढता येत नाही, महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू आहे. राजकारणात पूर्वी लोक तत्ववादी होते. ही लढाई वैयक्तीक नसुन विचारांची आहे. सत्तेच्या समिकरणात अनेकजण इकडून तिकडे जात असतात परंतु सरकार बदलल्यानंतर पुन्हा हे लोक आपले विचारही बदलतात. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (Local Government Elections) महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन नवीन चेहर्यांना संधी देणार असल्याचे माजीमंत्री दांडेगावकरांनी शेवटी सांगितले.