चक्क गृह मंत्र्यांच्या राजिनामाची मागणी
परभणी (Nationalist Mahila Congress Andolan) : राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी परभणी शहरात महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Mahila Congress Andolan) महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती मनिषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनानुसार, महाराष्ट्रात महिलांवर अमानुषपणे अत्याचाराच्या घटना वाढल्या, असून या घटनांमध्ये त्यांंचा निर्दयीपणे खून करण्यात आला त्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवर होणार्या या अत्याचाराच्या घटनांचा निषेध (Mahila Congress Andolan) राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करून शासनाचा निषेध करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे, शहराध्यक्ष वनिता चव्हाण, कार्याध्यक्ष सलमा शेख, सेलू तालुकाध्यक्ष सौ.निर्मला लिपणे, जिंतूर तालुकाध्यक्ष आशाताई खिल्लारे, पाथरी तालुकाध्यक्ष शेख रुखसाना, गंगाखेड तालुकाध्यक्ष सिमा घनवटे, सेलू तालुका उपाध्यक्ष बिलकिस शेख, उपाध्यक्ष सविता अंभोरे, रहेनाबी, संगीता भराडे, जिलानबी, सायराबी, सुनेराबी, आशा साळवे, देवीबाई बोराडे, मंदाकिनी रेंगे, सुनेरा हम्मीद, सलमा, शमीमा, हैसरबी यांच्यासह जिल्हयातून आलेल्या असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी पक्षाचे रमाकांत कुलकर्णी, गंगाधर यादव हे देखील उपस्थित होते.