हिंगोली (Nationalist OBC meeting) : येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी (Nationalist OBC) जनसंवाद अभियान मेळावा ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराचे कृतीशिल वारसदार पद्मविभुषण शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेतून खा. सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे दुसर्या टप्यात ओबीसी जनसंवाद अभियान प्रा. कविता म्हेत्रे (Prof. Kavita Mhetre) यांनी घेवुन ओबीसींना मार्गदर्शन केले.
हिंगोली शासकीय विश्राम गृह येथे ओबीसी संवाद बैठक आयोजित केली होती . या बैठकीत प्रा कविता म्हेत्रे यांनी मार्गदर्शन करताना (Nationalist OBC) ओबीसीच्या अनेक प्रश्नावर मार्गदर्शन केले. महिलांना शरदचंद्र पवार सर्व प्रथम ३३ टक्के नतर ५० टक्के आरक्षण दिले. महिला बाल कल्याण मंत्रालयाची स्थापना मुख्य प्रवाहात आणण्याच काम केले. आज काही ओबीसी व मराठा समाजामधे काही सत्तादारी पक्ष भांडण लावण्याचे काम करत आहेत. ओबीसी भाजपाचा डिएनए आहे पण स्थानिक स्वराज्य सस्थे मध्ये निवडणुक घेण्याची हिम्मत नाही कारण काय एखाद्या ओबीसी नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल याची भिती सत्ताधारी पक्षाला आहे.
इम्पेरियल डाटा मोदी सरकारने लपुन ठेवल्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत (Nationalist OBC) ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला अशा अनेक ओबीसी मुद्याला हात घातला. या वेळी त्या अनेक सामाजिक संघटने सोबत प्रा. कविता म्हेत्रे यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, अशोक श्रीरामे, अनिल पतगे, उमेश देशमुख, माधव कोरडे, बंडु मुटकुळे, संदीप बहिरे,संदिप देशमुख, शिवाजी शिदे, रवि गडदे, शामराव गुजर, संचित गुडेवार, भाऊराव ठाकरे ,केशव संकट, गजानन पोले, चद्रकात देशमुख, अशोक दिंडे, योगेश राहाटे, भागवत गुजर, बाजीराव दन्नर, कैलास मुजाळकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.