अमरावती (Nationalist Seva Dal) : जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी कॅाग्रेस सेवादलाच्या (Nationalist Seva Dal) अध्यक्षपदी आज राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते तथा युवा उद्योजक कीशोरभाऊ बरडे (Kishore Barde) यांची नियुक्ती करण्यात आली. सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॅा. जानबाजी मस्के यांनी किशोर बरडे यांना नियुक्तीपत्र दिले व पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, जिल्हा प्रवक्ते ॲड. संजय भोंडे,अमरावती तालुका राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष किशोर अब्रुक, भैय्यासाहेब तिरकर आदींची उपस्थिती होती.
कीशोर बरडे (Kishore Barde) यांनी आपल्या नियुक्तीबद्दल सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष डॅा. जानबाजी मस्के, अमरावती जिल्हा (Nationalist Seva Dal) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, सेवादलाचे प्रदेश ऊपाध्यक्ष शरद देवरणकर यांचे आभार मानले. बरडे यांचे सर्वश्री कीशोर अब्रुक, भैय्या तिरकर, राजु ठाकरे, जितु यावलीकर, सुधीर देशमुख, संजय कोठे, सचिन कोकाटे, सुधीर गुल्हाणे, सुनील मेश्राम, बंडु थोरात, शरद ठाकरे, घनश्याम पिकले, सुधाकर देशमुख, अनिल घोंगडे, कलीमखा पठाण यांनी अभिनंदन केले आहे.