वेगवान विकासाचे पर्यटनात याेगदान
नागपूर (Nitin Gadkari) : संत्री आणि वाघ ही विदर्भाची जगभरातील ओळख आधीपासूनच आहे. पायाभूत सुविधा निर्माण करताना दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता ठेवायला हवी. निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटनक्षेत्राची ताकद आहे. विदर्भात खाण पर्यटनाला प्राेत्साहन देण्याची गरज केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली. येत्या 5 वर्षात गडचिराेली सर्वाधिक जीएसटी देणारा जिल्हा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भ इकाॅनाॅमिक डेव्हलपमेंटकाऊन्सिलच्या वतीने आयाेजित अमेझिंग विदर्भ – सेंट्रल इंडिया टुरिझम या एकदिवसीय चर्चासत्रात ते बाेलत हाेते. मिहानमध्ये 68 हजार युवकांना राेजगार मिळाला असून, विकास वेगाने सुरू आहे. विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रात माेठी गुंतवणूक करण्यासाठी उद्याेजकांनी पुढे यावे, असं आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुढे बाेलताना केलं.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारीक सुरुवात झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते, वेद काऊन्सिल आणि आनंद राठी यांच्या वतीने तयार करण्यात आलेला ‘प्रमाेशन ऑफ विदर्भ टुरिझम’ या अभ्यासपूर्ण अहवालाचे प्रकाशन मुद्रीत आणि डिजिटल स्वरुपात करण्यात आले. ‘अमेझिंग विदर्भ-सेंट्रल इंडिया टुरिझम’ या चर्चासत्रात, विदर्भ आणि मध्य भारतातील या देखण्या प्रांतातील पर्यावरणाच्या संधींवर चर्चा झाली.
नितीन गडकरी यांनी वेद संस्थेच्या स्थापनेच्या आठवणी सांगितल्या. आपल्या खुमासदार शैलीत गडकरींनी महालसारख्या व्यस्त भागात काम करताना आलेले अनुभव आणि इतर किस्से सांगितले. नागपुरातील आगामी विकासकामं आणि उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. पटांगणं आणि उद्यानांची गरज, घनकचरा व्यवस्थापनावर भर, सांडपाण्याचा पुनर्वापर अशा उपक्रमांची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.
वेदच्या अध्यक्षा रीना सिन्हा यांनी प्रास्ताविकपर संबाेधनात, पर्यटनात वाढ करण्याच्या दृष्टीने काही मुलभूत साेयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासमाेर मांडला. त्यात, जागाेजागी स्वच्छतागृहांची व्यवस्था, रेल्वे स्टेशन्स आणि विमानतळासारख्या जागी जवळपासच्या पर्यटनस्थळांची माहिती देणारे डेस्क, हेरिटेज वाॅक, धार्मिक आणि कृषी पर्यटनाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला.
विदर्भ इकाॅनाॅमिक डेव्हलपमेंट काऊन्सिल अर्थात वेदच्या वतीने आयाेजित या कार्यक्रमाला पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती हाेती. या चर्चासत्राला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डाॅ. प्रशांत सवाई, तथास्तु रिसाॅर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल अगरवाला, परमजित एस. आहुजा डिझाईन स्टुडीओचे प्रमुख वास्तविशारद परमजीत आहुजा आणि टायगर ट्रेल्सचे संचालक आदित्य धनवटे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
पहिल्या सत्रात सीए आशिष यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन धाेरणातील तरतुदींवर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. विदर्भातील पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक आणि राेजगाराच्या संधी याविषयी सांगताना ते म्हणाले की, गुंतवणूक जास्त असली तरी त्यातून मिळणारा फायदा उत्पादन क्षेत्राच्या तुलनेने कमी असताे. मात्र, सरकारच्या नवीन धाेरणात कॅपिटल इनव्हेस्टमेंट इन्सेंटीव्ह वाढविण्यात आल्यामुळे पर्यटन क्षेत्राला त्याचा लाभ हाेईल. यासाेबतच, जमीन, पायाभूत सुविधा, एमएसएमई उपक्रम म्हणून पर्यटन क्षेत्रातील धाेरणात्मक निर्णयांची त्यांनी माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात पर्यटन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डाॅ. प्रशांत सवाई यांनी पर्यटनाच्या क्षेत्रात आागामी 10 वर्षांत 1 लाख काेटी रुपयांची गुंतवणूक येऊन 18 लाखांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राेजगार निर्मिती हाेण्याची अपेक्षा व्यक्त केली. पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यासाठी पर्यटकांच्या निवासाच्या साेयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धाेरण 2024 मधील तरतुदींची माहिती देताना, टूर ऑपरेटर्स, वीजेच्या दरात सवलती, हाेम स्टेचा विकास, काैशल्यविकास, कृषी पर्यटन, अॅडव्हेंचर पर्यटन यासह विविध तरतुदींचा त्यांनी उल्लेख केला.
तिसऱ्या सत्रात आनंद राठी असाेसिएट्सचे प्रतिनिधी सीए अतुल ठक्कर यांनी ‘इंडिया का टाईम आ गया है’ असे म्हणत, भारताच्या पर्यटन क्षेत्राचा जाेमदार विकास हाेत असल्याचे आवर्जून सांगितले. पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला देशविदेशातून येणारे पर्यटक प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले. साेबतच, विदर्भातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी कल्पक मार्केटींग करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटन्ट आणि वेद काऊन्सिलचे माजी अध्यक्ष शिवकुमार राव हे या चर्चासत्राचे समन्वयक हाेते. आभार प्रदर्शन वेदचे महासचिव अमित पारीख यांनी तर सूत्रसंचालन आशिष शर्मा यांनी केलं.