सरपंचाना मारहान प्रकरण भोवण्याची शक्यता
अर्जुनी/मोरगाव (Ladki Bahin Yojana) : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असुन या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले व कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. अर्जुनी/मोरगाव पंचायत समिति (Arjuni/Morgaon Panchayat Samiti) अंतर्गत येणाऱ्या नवेगाव/बांध ग्रामपंचायत कार्यालय येथे आशीष लंजे हा युवक जन्माचा दाखला मागण्यासाठी गेला होता मात्र ग्राम पंचायत कार्यालयात दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी बघुन सदर युवक हा बैठक हॉलमध्ये बसला असतांना अचानकपणे नवेगाव/बांध ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. हिराबाई नीलमचंद पंधरे यांनी आशिष लंजे या युवका जवळ जाऊन युवकाच्या दोन वेळा कानशिलात लगावल्याची घटना दि. 04 जुलै 2024 रोजी गुरुवार ला सकाळी 11:00 वाजता घडली.
लाडकी बहीण योजनेसाठी दाखला मागण्यासाठी गेले अन् सरपंचांनी तोंडावर मारले
सदर युवक आशीष सुभाष लंजे याने लगेचच नवेगाव/बांध येथील (Navegaon/Bandh Police) पोलीस स्टेशन ला जाऊन सरपंच सौ. हिराबाई पंधरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.तर आशिष लंजे यांनी पैशाचा हिशोब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलीस स्टेशनला महिला सरपंचांनी कबूल केले. सरपंच सौ. हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव/बांध येथे तक्रार नोंदवली असुन (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन. सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सरपंच हे एक प्रकारे गावचे प्रमुख व लोकप्रतिनिधी असुन अशा प्रकारे शासकीय कार्यालयात मारहाण करने योग्य आहे का ? असा प्रश्न आता नागरिकांना पडला असुन सामान्य जनतेवर अशा प्रकारे हात उगारणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरती जिल्हाधिकारी महोदयांनी अपात्रतेची कार्रवाई करुन पदमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मी आशीष सुभाष लंजे रा.नवेगाव/बांध (Navegaon/Bandh) येथील रहिवाशी असुन मी दि. 04 जुलै 2024 रोजी गुरुवार ला मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेस (Ladki Bahin Yojana) लागणाऱ्या जन्म प्रमाणपत्र करिता ग्राम पंचायत (Gram Panchayat) कार्यालय येथे गेलो परंतु नागरिकांची गर्दी असल्यामुळे मी बाजुच्या बैठक हॉल मध्ये बसलो होतो अचानक पणे सरपंच हीराबाई पंधरे ह्या माझ्या जवळ येऊन माझ्या कानशिलात लगावली मी लगेचच नवेगाव/बांध पोलीस स्टेशन (Navegaon/Bandh Police) येथे जाऊन सरपंच हीराबाई पंधरे यांच्या विरोधात गुन्हा नोदं केला असुन पुढील कार्रवाई करिता जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन अशा प्रकारे सामान्य नागरिकांवरती हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधींना सरपंच पदावरुन पदमुक्त करावे अशी माझी मागणी आहे.
– आशीष लंजे, तक्रारदार फिर्यादी