# बंजारा विरासत नंगारा
मानोरा(Manora):- बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नवरात्र उत्सवाच्या पहिली माळ दिनी दि. ३ ऑक्टोंबर रोजी गुरुवारी कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड (Guardian Minister Sanjay Rathore) यांनी धर्मगुरु बाबुसिंग महाराज व महंत मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आई भवानी देवी जगदंबा माता मंदिरात घट स्थापना करत पुजा केली. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा भवन येथे ध्वजारोहन कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आई भवानी देवी जगदंबा माता मंदिरात घट स्थापना करत केली पुजा
येत्या शनिवारी ५ ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) नव रात्रौ उत्सवाच्या पर्वावर देवी जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी येत आहे. त्यांचे सोबत केंद्रीय मंत्री(Union Minister) प्रतापराव जाधव, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रातील व राज्यातील कॅबिनेट, राज्य मंत्री, खासदार, आमदार आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्याची अंतिम तयारी झाली असुन नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या दिवशी पालकमंत्री ना संजय राठोड यांनी देवी जगदंबा देवी मंदिरात देवीची पूजा करून, संत सेवालाल महाराज व संत डॉ रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा भवन येथे महंतांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा ध्वज फडकाविला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सभा स्थळाची अधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली.