NCP-SCP जाहीरनामा 2024
पुणे (Pune) : लोकसभा निवडणूक-2024 साठी (LokSabha Elections) आज NCP-SCP ने जाहीरनामा (NCP-SCP manifesto) प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते पुण्यात हा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी या जाहीरनाम्याला ‘प्रतिज्ञापत्र’ असे नाव दिले आहे.
राष्ट्रवादी-एससीपीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, आज आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात जे मुद्दे समाविष्ट आहेत, ते मुद्दे आमचे नेते संसदेत मांडतील. आमचा (NCP manifesto) जाहीरनामा ‘प्रतिज्ञापत्र’ आहे. महागाईत वाढ होत असून, शेतकऱ्यांची गरीब स्थिती आहे. तसेच बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. मागील 10 वर्षांत एजन्सींचा गैरवापर आणि खाजगीकरण यासारख्या समस्या वाढत चालल्या आहेत. या जाहीरनाम्यामध्ये आम्ही (LPG gas) एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणार आहोत. आमची सत्ता आली तर, सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त जागा भरण्यात येईल. महिला आरक्षणावरही काम करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणणार आहोत.
#WATCH | Pune, Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar releases party's manifesto, for Lok Sabha elections. https://t.co/AkUtVjm5qK pic.twitter.com/endlJcTRzt
— ANI (@ANI) April 25, 2024
जाहीरनामा प्रसिद्ध करताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मागील 10 वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांत आत्महत्या थांबवण्याचे काम अमित शाहांनी केले आहे का?, (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, देशाचा पंतप्रधान हा कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नसतो. जातीय एकता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याबाबत जनजागृतीची गरज आहे.