खा. सुप्रियाताई सुळे विशेष यांची उपस्थिती
परभणी (Supriya Sule) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिक्षक सेलच्यावतीने रविवार २५ ऑगस्ट रोजी जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्स येथे शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन (NCP teachers cell) शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी केले आहे.
या संवाद मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून खा. सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी खा. फौजिया खान, आ. राजेश टोपे, खा. संजय जाधव, माजी आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. सुरेश वरपूडकर, माजी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ.विजयराव गव्हाणे, आ.डॉ.राहूल पाटील, माजी आ. विजय भांबळे, माजी आ. सिताराम घनदाट, बसवराज पाटील, भीमराव हत्तीअंबीरे, माजी आ.व्यंकटराव कदम, डॉ. नरेंद्र काळे, दिलीपराव सोनवणे, गोविंंद उगले, जाकेर अहमद खान, रितेश काळे,मनिषाताई केंद्रे, विकास लंगोटे आदींची उपस्थिती राहणार आहे.या मेळाव्यास शिक्षकवर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे.