परभणी/जिंतूर(Parbhani):- बसमध्ये चढत असताना महिला प्रवाशाजवळील १ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवार २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिंतूर येथील बस स्थानकात (Bus stand) घडली. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला आहे.
पर्स पाहिली असता पर्स उघडी असल्याचे दिसून आले
दिपाली गाडेकर यांनी तक्रार (Complaint)दिली आहे. फिर्यादी या चुलत बहिणीच्या मुलीचे लग्न(Marriage) असल्यानेजिंतूर येथे आल्या होत्या. २८ मे रोजी गावाकडे जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास त्या जिंतूर बस स्थानकात आल्या. यावेळी गाडीमध्ये चढत असताना काही महिला प्रवाशी गाडीतून उतरत होत्या. या दरम्यान फिर्यादीला चिमटा घेतल्याचा भास झाला. त्यांनी आपल्या जवळील पर्स पाहिली असता पर्स उघडी असल्याचे दिसून आले. पर्समध्ये प्लास्टीकच्या डब्बीत ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे दिसले. नेकलेस, गंठण, नत असे १ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केले आहेत.
परीक्षा केंद्रावरुन मोबाईल लंपास
जिंतूर : मुक्त विद्यापीठ पदवीची परीक्षा देण्यासाठी जिंतूर येथील एका केंद्रावर असलेल्या तीन विद्यार्थ्यांचे ४७ हजार ४९९ रुपये किंमतीचे तीन मोबाईल अनोळखी चोरट्याने लंपास केले. ही घटना जिंतूर शहरातील सिताराम मुंडे महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी सागर केकान यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चोरट्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.