पाेलीस अधिक्षक विशाल आनंद यांची माहीती
अमरावती (Amravati Police) : अमरावती जिल्ह्याची लाेकसंख्या वाढत असतांना गुन्हेगारीवरील नियंत्रण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नव्या पाच ते सहा पाेलीस ठाण्यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन (Amravati Police) जिल्हा पाेलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल आनंद यांनी केले. स्थानीक मराठी पत्रकार भवन येथील मीट द प्रेस कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
अमरावती जिल्ह्यात (Amravati Police) नव्या पाेलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात यावी यासाठी गृहविभागाकडे आपण पत्रव्यवहार केला आहे. त्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु असून शासन याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशाल आनंद यांच्या पत्नी डाॅ. श्रीलीना यासुध्दा उपस्थित हाेत्या. आपण हैद्राबाद येथील मुळ रहिवासी असून आई, वडील शासकिय कर्मचारी हाेते असे त्यांनी सांगितले. आयआयटीची पदवी घेतल्यानंतर2013 मध्ये युपीएससी उत्तीर्ण करुन आपण आयपीएस झालाे. समाजासाठी चांगले करण्याची प्रेरणा आई वडीलांनी दिल्याचे ते म्हणाले.
आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर माेठ्या वेतनाची नाेकरी न करता आपण आयपीएस झालाे. प्रत्येक दिवशी आपण नव्या आवाहनांना पुढे जात असताे असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी डाॅ. श्रीलीना म्हणाल्या की, आपण देखील सामान्य कुटूंबातील आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर आपला विशाल आनंद यांच्याशी विवाह झाला. विशाल आनंद (Amravati Police) पाेलीस दलातील कर्तव्यास प्राधान्य देत असल्याचे त्या म्हणाल्या.




