परभणी/गंगाखेड (Parbhani):- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)चौक, तहसिल कार्यालय परिसरात लागणार्या रेल्वे गेट मुळे मोठ्या प्रमाणावर दररोज वाहतूक कोंडी (Traffic congestion) होत असून त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. येथील रेल्वे फाटकावरील पुलाचा प्रश्न खुप दिवसांपासून प्रलंबीत असून याकडे तालुक्यातील लोकप्रतीनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
प्रत्यक्षात पुल कधी उभा राहणार? हा प्रश्न
गंगाखेड येथील पोलीस स्टेशनकडून तहसिलकडे जाणार्या रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. ते रेल्वे फाटक दिवसभरात सतत बंद होत असते. त्यामुळे येणार्या – जाणार्या वाहनांमुळे रेल्वे फाटकावर कायम वाहतुक कोंडी होत आहे. या ठिकाणी बांधण्यात येणार्या रेल्वे पुलाची (Railway bridge) चाचणी सुध्दा घेण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात पुल कधी उभा राहणार हा प्रश्न आहे. या रेल्वे फाटकावर बांधण्यात येणार्या रेल्वे पुलाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबीत असून लोकप्रतीनिधी, सजग नागरीकांनी या विषयी अनेक वेळा पाठ पुरावा सुध्दा केला आहे. परंतु विद्यमान आ.रत्नाकर गुट्टे, माजी आ.मधुसुधन केंद्रे लोकप्रतीनिधींनी गांर्भीयांने लक्ष न दिल्याने हा प्रश्न अने वर्षांपासून प्रलंबीतच आहे. त्यामुळे लोकप्रतीनिधींनी विशेष लक्ष देवून ह्या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज असल्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.
पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
रेल्वे फाटक लागल्यानंतर वाहन चालक दोन्ही बाजुंनी वाहने उभी करत असतात.त्यामुळे फाटक उघडल्यानंतर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलीस प्रशासन लक्ष देते मात्र वाहतूक कोंडी होण्याच्या अधी लक्ष देवून नियमांचे उलंघन करणार्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.