नुवाकोट (Nepal Helicopter Crash) : नेपाळमध्ये पुन्हा एकदा विमान कोसळले असून, या (Nepal Helicopter Crash) अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. नेपाळमधील नुवाकोट येथे हा अपघात झाला. (Air Dynasty) एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर अचानक कोसळल्याने, हेलिकॉप्टरला आग लागली आणि त्यात 4 जणांचा मृत्यू झाला.
टेक ऑफ केल्यानंतर 3 मिनिटांनी संपर्क तुटला
माहितीनुसार, नेपाळमधील शिवपुरी, नुवाकोटमध्ये हा भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. हेलिकॉप्टरने रसुवासाठी उड्डाण केले होते. या (Nepal Helicopter Crash) हेलिकॉप्टरमध्ये 4 चिनी नागरिकांसह पाच जण होते. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टरमध्ये सहवैमानिक होते. TIA वरून टेकऑफ झाल्यानंतर अवघ्या 3 मिनिटांतच हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला. काही वेळाने (Air Dynasty) हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आली.
अपघात कसा झाला?
हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमागे टेकडीची धडक बसल्याचे मानले जात आहे. माहितीनुसार, 5 जणांसह हेलिकॉप्टरने काठमांडू, नेपाळ येथून उड्डाण केले होते. त्यानंतर (Nepal Helicopter Crash) हेलिकॉप्टर नुवाकोट जिल्ह्यातील सूर्या चौर-7 येथील डोंगरावर कोसळले. टेकडीवर आदळल्यानंतर विमानाला आग लागली आणि आतील 4 जणांना आपला जीव गमवावा लागला.