अर्जुनी मोर (Gondia):- नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा धाबेटेकडी पवनी येथील डाॅ.राहुलशाम ठवरे वय ४०वर्ष शशिकांत शाम ठवरे वय ३७वर्ष चंद्रकला शाम ठवरे वय ६२ वर्ष (प.स.स).धाबेटेकडी नागपूर येथून आलेले ५ महिला, ४ पुरुष सर्वांनी मिळून श्रीदेवी दिग्मबर ठवरे वय 39 वर्ष या विधवा महिलेला तिच्या शेतात जाऊन जबर मारपीट केली.
विधवा महिलेला तिच्या शेतात जाऊन जबर मारहाण
यात तिला मार लागल्याने ती पोलीस स्टेशन (police station) नवेगाव बांध येथे आरोपी विरुद्ध तक्रार (complaint)नोंदवली. सविस्तर वृत्त असे की, ठवरे परिवारात असलेल्या श्रीदेवी ठवरेचे पती व डॉ. राहुल ठवरे यांचे वडील हे दोघे सख्खे भाऊ असून दिग्मंबर ठवरे व शाम ठवरे मरण पावल्याने सदर शेतीचे बटवाळे झाले, या बटवाळ्यात दिगंबर ठवरे यांना तीन एकर शेती मिळाली दिग्मबर ठवरे हे शासकीय सेवक अस्ताना मृत्यू (Death)पावले, मृत्यू पावल्यानंतर श्रीदेवी दिग्मबर ठवरे ही तिचा भाऊ पंकज माणिकराव गायधने लाखणी जिल्हा भंडारा (bhandara)इथं राहतात. त्या ठिकाणातून आपली शेती पाहत होत्या. याआधी शेती डॉ.राहुल ठवरे बटईने करीत त्यांच्या. मोबदल्यात तीन पोती तांदूळ देत होते. मात्र यावर्षी श्रीदेवी दिग्मबर ठवरे यांनी शेतीची मशागत करून शेतामध्ये धानाची पेरणी केली. रोवनी करण्याकरितादिनांक 26/07/2024/ ला सकाळी नऊ वाजता लाखनी इथून मजूर घेऊन शेतात आल्या.
संधीचा फायदा घेऊन आरोपींनी सामूहिक रित्या फिर्यादीवर हल्ला करून तिला मारहाण
या संधीचा फायदा घेऊन आरोपींनी सामूहिक रित्या फिर्यादीवर हल्ला करून तिला मारहाण (Beating) केला. यामध्ये त्यांच्या हात. पाय, डोक्याला जबर मार लागला. शेतात काम करण्याकरिता आलेल्या मजुरांना धमक्या देऊन शेताबाहेर काढले. सर्व प्रकरणाची तक्रार नवेगाव बांध येथील पोलीस स्टेशनला देण्यात आली नवेगाव बांध चे पोलीस निरीक्षक योगिता चाफले व सहकारी गुन्ह्याचा तपास करीत आहेत. फिर्यादीला जबर मार लागल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय (rural hospital) नवेगाव बांध येते उपचार सुरू आहे.