फक्त 3.3 सेकंदांमध्ये 0-100 किमी/तास गती प्राप्त करण्यासह अव्वल
नवी दिल्ली (BMW Motorrad India) : ऑटो एक्सपो 2025 च्या दुसर्या दिवशी भारतात नवीन बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर (BMW S1000 RR) लाँच करण्यात आली आहे. ही अत्यंत लोकप्रिय सुपर स्पोर्ट बाइक देशामध्ये कम्प्लीटली बिल्ट-अप युनिट म्हणून उपलब्ध असेल. बीएमडब्ल्यू मोटोर्राड डीलर नेटवर्कमध्ये बुकिंग सुरू आहेत तर, डिलिव्हरी एप्रिल 2025 पासून सुरूवात होणार आहे.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे BMW Motorrad India) अध्यक्ष व सीईओ विक्रम पावाह म्हणाले की, ‘नवीन बीएमडब्ल्यू एस 100 आरआर ने (BMW S1000 RR) सुधारणा व यशासाठी अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ही बाईक रोमांचपूर्ण राइडचा शोध घेणार्या रेसिंग उत्साहींमध्ये लोकप्रिय आहे. नवीन बीएमडब्ल्यू एस 100 आरआर उच्च ट्रॅक परफॉर्मन्ससह सुपरबाइक आयकॉन आहे. बीएमडब्ल्यू मोटोर्राडने पुन्हा एकदा स्पोर्टी महत्त्वाकांक्षा आणि बीएमडब्ल्यू डीएनएवर भर दिला आहे, ज्यामुळे चांगली वैशिष्ट्ये अधिक उत्तम झाली आहेत.
स्इन्वॉइसिंगच्या वेळी अस्तित्वात असलेली किंमत लागू होईल. डिलिव्हरी एक्स-शोरूममधून होतील. एक्स-शोरूम किंमती (जीएसटी व कम्पेन्सेशन सेससह) लागू होतील परंतु त्यात रोड टॅक्स, आरटीओ स्टॅट्युअरी टॅक्स/फीज, इतर लोकल टॅक्स/सेस लेव्हीज आणि इन्शुरन्स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. किमती आणि पर्याय पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे.
नवीन बीएमडब्ल्यू एस 100 आरआर मध्ये पोटेण्ट इनलाइन-फॉर इंजिनसह (BMW Motorrad India) बीएमडब्ल्यू शिफ्टकॅम टेक्नॉलॉजी आहे. 999 सीसी इंजिन प्रबळ प्रोपल्शन देण्यासाठी 13,750 आरपीएममध्ये 210 एचपी पॉवर निर्माण करते. 14,600 आरपीएममध्ये सर्वोच्च इंजिन स्पीड मिळते. एम आरआर वरील एअरबॉक्समध्ये व्हेरिएबल इनटेक फनेल्स आहेत, जे विशेषत: उच्च इंजिन स्पीड्समध्ये चार्ज चेंज व पॉवर जनरेशन सानुकूल करतात.