नवीन वाहनाचे आ.मुटकुळे, जिल्हाधिकारी गुप्तांच्या हस्ते पुजन
हिंगोली (Hingoli) :- अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. या आगीवर नियंत्रण आणण्याकरीता अग्निशमन दलाचे (Fire brigade) वाहन अत्यावश्यक असते, हिंगोली नगर पालिकेकडे यापूर्वी ५ वाहने व २ बुलेट कार्यरत असताना आता सहावे वाहन अग्निशामन दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झाले आहे.
यापूर्वी हिंगोली न.प.च्या अग्निशमन दलात ५ वाहने २ बुलेट
हिंगोली शहरासह अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडतात. त्या अनुषंगाने आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता अग्निशामन दलाचे वाहन अत्यावश्यक ठरत असते. त्या अनुषंगाने हिंगोली नगर पालिकेने यापूर्वी अग्निशमन दलात तीन मोठे व दोन वाहने उपलब्ध केलेले आहेत. त्याच प्रमाणे लहान गल्लीबोळात चारचाकी वाहन जात नसल्यास अशा आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता यापूर्वी दोन बुलेट उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आता पुन्हा एक अग्निशमन दलाचे एक वाहन उपलब्ध झाले आहे. त्या निमित्ताने २६ एप्रिल रोजी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते या नवीन वाहनाचे पुजन करण्यात आले. हे नवीन आणलेले वाहन आपातकालिन परिस्थितीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन करण्याकरीता उपयोगात येणार आहे. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, नगर अभियंता प्रतिक नाईक, अग्निशन दलाचे प्रमुख अक्षय तांडेल, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अॅड. के. के. शिंदे, आशिष जयस्वाल, नितीन पहीणकर, संजय ननवरे, बजरंग थिट्टे, दिलीप दोडके, रघुनाथ बांगर, अरूण उबाळे, शेख अमजद आदींची उपस्थिती होती.