हिंगोली (Hingoli Suicide Case) : रिसोड येथील ३० वर्षीय विवाहितेने हिंगोलीतील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना शनिवारी घडली. मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील नंदिनीचा विवाह रिसोड येथील प्रतिक करवा याच्या सोबत मागील दोन महिन्यापूर्वी झाला होता. १४ सप्टेंबर रोजी हिंगोलीतील एका प्रसिद्ध लॉजमध्ये दुपारी १.३० च्या सुमारास आली होती. तिने हिंगोलीतील तिचे भाऊजी गोपाल पुरोहित यांच्या मोबाईलवर (Suicide Case) आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठविला.
पुरोहित यांनी ही माहिती तात्काळ गंगापूर येथे तिवारी कुटुंबियांना दिली आणि ते लॉजमध्ये पोहचेपर्यंत नंदिनीने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन (Suicide Case) आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह सपोनि जाधव, बनसोडे, पोउपनि गंधकवाड, प्रो.पोउपनि गायत्री तारटे, गणाजी पोटे, संभाजी लकुळे, गणेश धामणे, धनंजय क्षीरसागर, गणेश लेकुळे, संतोष करे, अजहर पठाण हे पथक लॉजवर पोहचले. नेमकी आत्महत्या कोणत्या कारणावरून केली याचा उलगडा सांयकाळ पर्यंत झाला नव्हता.