आंतरराष्ट्रीय योग दिनाला सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात सहभाग
नागपूर (Ngapur Yoga Day) : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal) आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (International Yoga Day) जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आज धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या नागपूरकरांसोबत योगासने केली. नागपुरात अनेक योग शिक्षक योगासनाचे क्लासेस घेतात आणि त्या माध्यमातून आपल्या येथील तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याचेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली.
नियमित योग साधनेतून आरोग्य उत्तम राखता येते आणि त्यातून सुखी जीवनाचा मार्गही गवसतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले. नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal) आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (International Yoga Day) जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ना. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, मी स्वतः कितीही व्यस्त असलो तरी दररोज दोन तास न चुकता योगासने आणि प्राणायाम करतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. प्रत्येकाने आपल्या आरोग्याला पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य उत्तम असेल तरच सुखी जीवनाचा मार्ग सापडतो. म्हणूनच आज संपूर्ण जगात योग आणि प्राणायाम करण्याला मान्यता आहे.
क्रीडापटूंचा सन्मान
राष्ट्रीय तसेच (International Yoga Day) आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. वैभव श्रीरामे , हर्षल चुटे,छकुली सेलोकर, तेजस्विनी खिंची, यज्ञेश वानखेडे, खुश इंगोले, वैभव देशमुख, रचना आंबुलकर, अलिशा गायमुखे, ओम राखडे, प्रणय कंगाले, श्रावणी राखुंडे, निसर्गा भगत, मृणाली बानाईत, श्रीराम सुकसांडे या क्रीडापटूंना ना. गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्व. भानुताई गडकरी संस्थेतर्फे नेत्र तपासणी
स्व. भानुताई गडकरी (Nitin Gadkari) ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने (International Yoga Day) योग दिनाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम परिसरात नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. यावेळी चष्म्यांचे देखील वाटप करण्यात आले. अनेक पोलिसांनी देखील नेत्र तपासणी करून घेतली. शिबिराला योगगुरू रामभाऊ खांडवे, आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदी मान्यवरांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले.