निलंगा(Nilanga) :- कार्यकर्ता आणि नेता यांचे एक वेगळचं नातं असतं. तेवढ्या विश्वासाचं आणि प्रेमाचं हे नातं असतं. या प्रेमापोटी कार्यकर्ते काही करण्यास तयार असतात. अशा कार्यकर्त्यांची नेतेही खास काळजी घेतात. एक असा कार्यकर्ता आहे ज्याने आपला नेता जोपर्यंत विधानसभेवर (Assembly) निवडून जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण केला होता. तो पण पूर्ण होण्यासाठी त्याला आणखीन वाट पाहावी लागली. जेव्हा त्याची माहिती नेत्याला समजली तेव्हा नेत्यानेही मोठ्या मनाने या कार्यकर्त्याची भेट घेतली. त्याला स्वत:च्या हाताने चप्पलही घातली.
अभयदादा साळुंके हे आमदार होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही..
ही घटना लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातली. औंदुबर पांचाळ होनाळीकर हे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील होनाळी गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच आहेत. ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस (Congress)उमेदवार अभयदादा साळुंके यांचे ते कार्यकर्ता आहेत. अभय साळुंके यांच्यासाठी त्याने सुरूवातीपासूनच जिवाचे रान केले आहे. याच निलंगा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांचा पराभव झाला. याच औदुंबर पांचाळ होनाळीकर यांनी शपथ घेतली होती की, मतदारसंघातून जोपर्यंत अभयदादा साळुंके हे आमदार होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही.
ही शपथ पूर्ण होण्यासाठी त्याला आणखीन वाट पहावी लागली
अभय साळुंके हे राजकारणात सक्रीय आहेतच. त्यांना निलंगा मतदार संघातून उमेदवारीही मिळाली होती. पण जिंकण्यासाठी त्यांच्या समोर तगडे आव्हान होते. स्वकियांबरोबरच मित्रही विरोधात उभे ठाकले होते. शिवाय विरोधकांचे आव्हान तर होतेच. अशा वेळी विजय मिळविणे थोडा अवघड झाले. पण त्यांनी तगडी झुंज दिली. मेहनत घेतली. शेवटी निलंगा मतदार संघातून त्यांनी 98 हजार एवढी मते मिळविली. अभयदादा जोपर्यंत आमदार होतं नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अस प्रण औदुंबर पांचाळ होनाळीकर यांनी केला होता. पण विधानसभा निवडणुकीत पराभव मान्य करून आपल्या प्रिय कार्यकर्त्याला भर पेहराव आहेर आणि स्वतःच्या हाताने नवीन चप्पल घालून अजून जोमाने आणि हिंमतीने लढू. जसे मागील 25-30 वर्ष निलंगा तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मदतीसाठी उभा राहिलो तसाच पुढे राहीन, असा शब्द निलंगा विधानसभा 2024 चे लोकप्रिय उमेदवार अभयदादा साळुंके यांनी दिला.
तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी नेते कार्यकर्ते बुथ प्रमुख महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित
हा कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर २४ रोजी देवणीच्या संगमेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी देवणी तालुक्याचे आधारस्तंभ श्री मल्लिकार्जुन मानकरी सावकार, ज्येष्ठ नेते काँग्रेस देवणी, दिलीप पाटील नागराळकर संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर, ॲड. अजित बेळकोणे विळेगावकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी देवणी, जावेद तांबोळी शहराध्यक्ष, अजित माने, पंकज शेळके, सौ. कुशावर्ता बेळे, बालाजी कारभारी, अमर मुर्के, मुकेश सुडे, शरण लुल्ले, बालाजी वळसांगवीकर, वैजनाथ लुल्ले सावकार, रामभाऊ भंडारे, संजय घोरपडे, योगेश ढगे तसेच देवणी तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी नेते कार्यकर्ते बुथ प्रमुख महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.