नवी दिल्ली (Niti Aayog) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने NITI आयोगाची पुनर्रचना केली. ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि उपाध्यक्ष सुमन के बेरी असणार आहेत. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकानुसार, (Cabinet Secretariat) मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधानांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI आयोग) च्या सुधारित घटनेला मान्यता दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हे नवीन पदसिद्ध सदस्य आहेत, तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी हे नवीन सदस्य आहेत. (Cabinet Secretariat) मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अधिसूचनेला अनुसरून पंतप्रधानांनी NITI आयोगाच्या सुधारित घटनेला मान्यता दिली आहे. NITI आयोगाच्या (Niti Aayog) सुधारित संरचनेनुसार, सुमन के बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहतील, तर व्हीके सारस्वत, रमेश चंद, व्हीके पॉल आणि अरविंद विरमानी पूर्णवेळ सदस्य राहतील.
राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री
अमित शाह, गृहमंत्री आणि सहकार मंत्री
शिवराज सिंह चौहान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
निर्मला सीतारामन, अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
नितीन जयराम गडकरी, एचडी कुमारस्वामी जीतनराम मांझी