नितीन गडकरी यांचा जातीयतेवर हल्ला
नवी दिल्ली/मुंबई (Nitin Gadkari) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सेंट्रल इंडिया ग्रुप (Central India Group) ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी समानता आणि निष्पक्षतेवर भर दिला आणि जातीवर आधारित राजकारण नाकारण्याचा जोरदार संदेश दिला. ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर करू नये, तर त्याच्या गुणांच्या आणि कृतींच्या आधारावर केले पाहिजे.
जो करेगा जात की बात, उसे कसके मारूंगा लात🦵@nitin_gadkari #Maharashtra #NitinGadkari #Nagpur #Viral #Trending #BJP #congress #Muslim #CastePolitics pic.twitter.com/U5Ja70x4G0
— Sanjeev (@sun4shiva) March 16, 2025
यावेळी गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांच्या आयुष्याशी आणि राजकारणाशी संबंधित अनुभव सांगितले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर कोणताही परिणाम झाला तरी ते कोणत्याही परिस्थितीत जातीच्या राजकारणाला प्रोत्साहन देणार नाहीत हे स्पष्ट केले. निवडणूक जिंकण्यापेक्षा किंवा हरण्यापेक्षा स्वतःची तत्वे आणि मूल्ये जपणे जास्त महत्त्वाचे आहे, असेही (Nitin Gadkari) त्यांनी सांगितले.
‘ओळख ही जात, धर्म किंवा भाषेवर आधारित नाही’
गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जात, धर्म आणि भाषेच्या नावाखाली समाजाचे विभाजन करण्याऐवजी आपण व्यक्तीच्या गुणांवर आणि क्षमतांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या जाती, धर्म, भाषा किंवा लिंगाने ठरवली जात नाही, तर त्याच्या गुणांनी ठरवली जाते.”
जातीबद्दल बोलणाऱ्यांना चोख उत्तर
आपला अनुभव सांगताना गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, जातीच्या नावाखाली अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. परंतु त्यांनी नेहमीच त्यांच्या तत्त्वांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी सभेत सांगितले की, “मी 50,000 लोकांना सांगितले होते, जर कोणी जातीबद्दल बोलले तर मी त्याला जोरदार लाथ मारेन.” त्यांच्या विधानामुळे त्यांना नुकसान होऊ शकते, असा इशारा अनेकांनी त्यांना दिला. परंतु गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, ते त्यांच्या तत्त्वांवर ठाम राहतील. ते (Nitin Gadkari) म्हणाले की, “निवडणूक हरल्यानंतर आयुष्य संपत नाही, परंतु कोणीही आपल्या विचारांशी तडजोड करू शकत नाही.”