समीर मेघे यांच्या प्रचारार्थ बुटीबोरी व टाकळघाट येथे जंगी सभा
हिंगणा (Nitin Gadkari) : जो परिसर सुविधांपासून वंचित होता त्या हिंगणा मतदारसंघात (Hingana Assembly Election) मागील दहा वर्षांमध्ये आठ हजार कोटी रुपयांची कामे झालीत. येत्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा एक हजार कोटी रुपयांची नवीन कामे सुरू होणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हिंगणा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या प्रचारार्थ बुटीबोरी व टाकळघाट येथे आयोजित सभेत केले.
या सभांना माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार सागर मेघे (MLA Sameer Meghe), माजी नगराध्यक्ष बबलू गौतम, आतिश उमरे, विनोद सातंगे, दिवाकर पाटने, धनराज आष्टणकर, किशोर पडवे, नीता वलके, प्रवीण शर्मा, अविनाश गुजर, आकाश वानखेडे, अनिल ठाकरे, दिलीप माथनकर, मुन्ना जयस्वाल, दिलावर खान, विनोद लोहकरे, हरीशचंद्र अवचट, प्रदीप ठाकरे, वैशाली केळकर, नत्थुजी कावरे, उमेश कावडे, अविनाश गुजर, विनोद सादगे, महेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज हिंगणा मतदारसंघाचे (Hingana Assembly Election) चित्र समीर मेघे यांच्या नेतृत्वात बदलत आहे, असे सांगून ना. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, बुटीबोरी परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आले. इंटरनॅशनल लॉ स्कूल, ट्रिपल आयआयटी आले. चार हजार कोटी रुपयांचा रिंग रोड पूर्ण झाला. या भागाचा नव्याने विकास होत आहे. मिहानचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आहे. उत्तम रस्ते झाले आहेत. या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बर्ड पार्क झाले. बुटीबोरीला साडेचारशे कोटींचा मदर डेअरीचा प्लान्ट सुरू होणार आहे. पुढील दोन वर्षांत बुटीबोरीला मेट्रो सुरु होणार असून खाली सहापदरी रस्ता, मधल्या भागात उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो धावणार आहे. बुटीबोरी औद्योगिक परिसरात स्मार्ट सिटी निर्मितीचा आमचा संकल्प आहे. त्यासोबतच स्मार्ट खेडी उभारण्याचेही काम सुरू झाले आहे. समीर मेघे यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते निर्माण केले. पिण्याच्या पाण्याच्या योजना आखल्या आणि त्या पुर्णत्वाला नेल्या. तुम्ही पूर्ण ताकदीने समीरला निवडून दिले तर यापेक्षा दुप्पट कामे या मतदार संघात दिसून येतील, असा विश्वासही ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.
एक चांगला सुसंस्कृत व लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा नेता समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे, असे सांगून ना. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, हिंगण्याला मोठे मेडिकल कॉलेज सुरू व्हावे, असा आपला मानस होता. माजी खासदार दत्ता मेघे आणि समीर मेघे यांच्या प्रयत्नातून व परिश्रमातून सुसज्ज मेडिकल कॉलेज आणि अद्ययावत रुग्णालय सुरू झाले. पुढे कोरोना काळात याच रुग्णालयातून लोकांना आरोग्यसेवा देण्यात आली, हजारो गोरगरिबांचे प्राण वाचविण्याचे काम या रुग्णालयाने केले. त्याचे श्रेय समीर मेघे यांना आहे, असेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
सभेला समीर जैस्वाल, दीपक गुजर, हरिचंद्र अवचट, सोपान बेताल, दिलीप माथनकर, नत्थुजी कावळे, अंजली कानफाडे, कृष्णाजी गंधारे, प्रदीप ठाकरे, वैशाली केळकर, साक्षी गायकवाड, मंगेश आंबटकर, महेंद्रसिंग चौहान, सुनीता जेऊरकर, विद्या दुधे, रुपाली टेकाडे, रेखा चटप, अनिस बावला, बल्लू श्रीवास, राजकुमार शर्मा, समीर बोरकुटे, विजय गहरूले, रामभाऊ माथुरकर, नाना हुसुकले, अर्चना अवचट, रोशनी उमरे, मंदार वानखेडे, सनी चौहान, नरु गौतम, बबलू सरफराज, वीणा ठाकरे, प्रशांत डाहुले, उमेश कावळे, राष्ट्रपाल गायकवाड, चंदु कावळे, बंटी भगत, नरेंद्र येसनकर, मधुकर खोडे, शेखर इंगोले, बेबी राऊत, अलका वानखेडे, रोहित तिवारी, कोमल कटरे, सोपान बेताल, किशोर गंधारे, देवेंद्र आष्टनकर, रविंद्र आष्टनकर, नानाजी कैकाडे, विनायक आष्टनकर, मधुकर वलके, अक्षय लोडे, देवेंद्र अष्टनकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.