रस्त्यांच्या लोकार्पण व भूमीपूजनासाठी ऑक्टोबरमध्ये गडकरी परभणी दौर्यावर
आ. विटेकरांची माहिती
परभणी (Nitin Gadkari) : जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या प्रलंबित कामांसाठी केंद्रीय रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भरघोस निधी मंजूर केला असून जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमासाठी ते ऑक्टोबर महिन्यात परभणी जिल्हा दौर्यावर येणार असल्याची माहिती (MLA Rajesh Vitekar) आ. राजेश विटेकर व आ. डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांनी दिली आहे.
नागपूर येथे आ. विटेकर (MLA Rajesh Vitekar) व गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. त्यावेळी रस्ते बांधणी व पुलाच्या निमिर्तीसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानले. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ३६ कोटी रुपये खर्चाच्या गंगाखेड – धारखेड, गोदावरी नदीच्या पुल, बंधार्याचे लोकार्पण राष्ट्रीय महामार्ग ७५२ के साठी निधी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी देवगाव फाटा ते इंजेगाव दरम्यान ७० किलोमिटर रस्त्यासाठी ७६१ कोटी ८१ लाख मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. या रस्त्याच्या भूमीपूजनासाठी त्यांना ऑक्टोंबर महिन्यात निमंत्रीत करण्यात आले आहे. या शिष्टमंडळात सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, अमर वडकर, शामसुंदर पांपटवार, विनोद चिमनगुंडे, विष्णू चव्हाण, पराक्रम टोंम्पे, श्रीराम वांगकर, भगवान मोहिते, रामभाऊ नवले, घनशाम सारडा यांची उपस्थिती होती.
आ. राजेश विटेकरांच्या प्रयत्नांना यश
जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. त्यांना रस्त्यांच्या लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळ्यासाठी निमंत्रण दिले असून ते ऑक्टोबर महिन्यात येणार आहेत.
– आ. राजेश विटेकर