जय विदर्भ पार्टी यांचे गडकरींना निवेदन
नागपूर (Nitin Gadkari) : जय विदर्भ पार्टीतर्फे आज ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन स्मार्ट मीटर (Smart meter) विदर्भात कुठेही लावले जावू नये, यासाठी आपण लोकसभेचे सदस्य म्हणून संसदेत आवाज उचलावा व स्मार्ट मीटरच्या तावडीतून वैदर्भीय जनतेला वाचवावे, असे निवेदन (Jai Vidarbha Party) जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार(Arun Kedar) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळासह देण्यात आले. निवेदन स्वीकारताना गडकरी यांनी शिष्टमंडळाला बराच समजावण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट मीटरचे (Smart meter) समर्थन करताना बोलले की, स्मार्ट मीटरमुळे विजेची चोरी थांबेल व इतरही फायदे त्यांनी सांगितले.
जय विदर्भ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार (Arun Kedar) यांनी शिष्टमंडळातील पदाधिकार्यांना संबोधित करताना सांगितले की, हा लढा आता पूर्णत्वास नेण्यासाठी आपणास सर्वांना अधिक जनजागृती करावी लागणार आहे. स्थानिक खासदार व आमदार यांना जनतेचे काहीही देणे घेणे नसून, त्यांना त्यांचे स्वतःचे व उद्योगपत्यांचे कसे भले होऊ शकते एवढीच चिंता आहे. या शिष्टमंडळामध्ये (Jai Vidarbha Party) जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, महासचिव विष्णू आष्टीकर, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, पोलिट ब्युरो तात्यासाहेब मते, नागपूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौलतकर, नागपूर शहर सचिव नरेश निमजे, राजेंद्र सतई, ज्योती खांडेकर, रवींद्र भामोडे, अशोक पाटील, प्रशांत नखाते, सतीश शेंद्रे उपस्थित होते.